Dhule News: आदिवासी बांधवांची आमचूर बनविण्याची लगबग! पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह पावसाने कैऱ्यांचे मोठे नुकसान

Dhule News : यामुळे आदिवासी बांधवांना थोड्या फार प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल्याचे चित्र आहे.
Sitting in front of the house and making amchur by grinding kaira. In the second photograph, Amchura pods are being dried in the sun at Mohgaon (T.Sakri).
Sitting in front of the house and making amchur by grinding kaira. In the second photograph, Amchura pods are being dried in the sun at Mohgaon (T.Sakri). esakal
Updated on

वार्सा : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह पावसाने ऐन तोडणीला आलेल्या कैऱ्या पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीत ज्या कैऱ्या पडल्या त्याच्यातून चांगल्या कैऱ्यांचे सध्या आमचूर बनविण्याचे काम करताना आदिवासी महिला व बांधव दिसत आहेत. या कैऱ्या किसून त्यांचे पातळ (बारीक) काप करून सुकवून व्यापाऱ्याला विकले जातात. (Dhule Tribal busy making Amchur In western belt of Pimpalner)

पश्चिम पट्ट्यात या वर्षी आंब्यांना चांगला मोहर आला होता. त्यामुळे आंबेही जास्त प्रमाणात लगडले होते; परंतु कैऱ्या ऐन तोडणीसाठी तयार झालेल्या असताना सुसाट वाऱ्यामुळे त्या गळून पडल्या. या कैऱ्यांचा आमचूर बनविण्याकडे पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधवांचा कल दिसत आहे. यामुळे आदिवासी बांधवांना थोड्या फार प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल्याचे चित्र आहे; परंतु आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

या कैऱ्यांपासून आमचूर तयार करून त्या चांगल्या प्रकारे सुकविल्या जातात. मग विक्रीसाठी उपलब्ध होतात. राज्यातील आदिवासी बांधव आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पश्चिम पट्ट्यात वनउपज खरेदी व विक्रीसाठी मोहगाव, बारीपाडा, चावडीपाडा येथे वन-धन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. सध्या महुफुले, टोळमी यांची खरेदी सुरू आहे, तसेच वनउपजमध्ये करवंद, आंबे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पिंपळनेर येथे सकाळी सकाळी बसस्थानक परिसरात उपलब्ध असतात.

सध्या पश्चिम पट्ट्यात कच्च्या कैऱ्यांपासून आमचूर तयार केला जात असून, सुकवून विक्री केला जातो. पश्चिम पट्ट्यात या वर्षी वादळी वाऱ्यासह जोरदार चक्रीवादळ व पाऊस पडल्याने सर्वांत मोठे नुकसान शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे झाले आहे. पिकलेले आंबे, कैऱ्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत. काही आदिवासी बांधव कैऱ्यांचे आमचूर बनविण्यात व्यस्त आहेत. (latest marathi news)

Sitting in front of the house and making amchur by grinding kaira. In the second photograph, Amchura pods are being dried in the sun at Mohgaon (T.Sakri).
School News : युनिव्हर्सल शाळेची मुजोरी; शुल्क भरूनही टीसी देण्यास नकार

साक्री तालुक्यातील पिंपळनेर पश्चिम पट्ट्यात कैऱ्यांपासून आमचूर बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात करतात. आमचुरापासून वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ तसेच आमरस, थंडपेय बनविण्यासाठी व्यापारी वर्ग घेतात. पिंपळनेर येथील आठवडेबाजारातदेखील खेड्यापाड्यातील आदिवासी बांधव विक्रीसाठी आणताना दिसतात. येथील व्यापारी ते बाजरातदेखील खरेदी करतात.

व्यापारी जातात प्रत्येक गावात

पश्चिम पट्ट्यात आमचूर खरेदीसाठी व्यापारी प्रत्येक गावात जातात. जशी प्रत तसा भाव आमचुराला दिला जातो. स्वच्छ व चांगले कोरडे असल्यास ६० ते ७० रुपये किलोने घेतो. ओले किंवा काळसर असल्यास ५० ते ५५ रुपये किलो, सफेद नसल्यास अजून दर कमी होतात. परंतु सरासरी ५० ते ६० रुपये किलो दराने खरेदी करून घेतो, असे पिंपळनेर येथील व्यापारी प्रमोद भदाणे यांनी सांगितले.

Sitting in front of the house and making amchur by grinding kaira. In the second photograph, Amchura pods are being dried in the sun at Mohgaon (T.Sakri).
Dhule Digital Marathi School: ...आता पुन्हा मराठी शाळांचा डंका! शाळा झाल्या डिजिटल; कात टाकल्याने वाढले प्रवेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.