Dhule News : साक्री येथील केटीवेअर बंधाऱ्यात बुडून दोन शालेय मुलांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २१) उघडकीस आली. त्यातील एकाची ओळख पटली आहे. त्याबाबत साक्री पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २०) अपहरणाची नोंद झाली होती. दुसऱ्या मुलाचा सोमवारी दुपारी उशिरापर्यंत शोध सुरू होता. (Two school children died in Ketware barrage)