Dhule Police Recruitment: सर्वच शैक्षणिक शाखांच्या उमेदवारांची भरतीत धाव! पोलिसांच्या 57 जागांसाठी अडीच हजारांवर अर्ज

Police Recruitment : पोलिसांच्या ५७ जागांसाठी अडीच हजारांवर अर्ज दाखल आहेत.
Candidates running on Wednesday as part of the police recruitment process at the police drill ground.
Candidates running on Wednesday as part of the police recruitment process at the police drill ground.esakal
Updated on

Dhule Police Recruitment : कला, वाणिज्य, विज्ञान, कृषी, अभियांत्रिकी, वकिली, समाजकार्य, बिझनेस मॅनेजमेंट, बी-फार्म यासह सर्वच शैक्षणिक शाखांतील उमेदवारांनी पोलिस होण्यासाठी भरती प्रक्रियेत धाव घेतली. येथील पोलिसांच्या ५७ जागांसाठी अडीच हजारांवर अर्ज दाखल आहेत. या प्रक्रियेच्या बुधवारी (ता.१९) पहिल्या दिवशी पाचशेपैकी तीनशे उमेदवारांची अनुपस्थिती होती. भरती प्रक्रिया पारदर्शकतेने होण्यावर भर असून कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. (Two thousand applications for 57 police posts )

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या देखरेखीत पोलिस कवायत मैदानावर भरती प्रक्रिया होत आहे. यात पोलिसांच्या ५७ जागांसाठी २ हजार ४७५ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. भल्या पहाटे बुधवारी पोलिस कवायत मैदानावर भरतीसाठी तीनशे तरुण उमेदवारांनी हजेरी लावली. पाच दिवस मैदानी स्पर्धेतून भरतीची प्रक्रिया चालेल. पाचव्या दिवशी महिला उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविले आहे.

पाचशे जणांना संधी

पोलिस भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांना मैदानी चाचणीची संधी दिली. त्यापैकी तीनशे उमेदवार उपस्थित, तर दोनशे गैरहजर होते. उंची, छाती मोजमापाच्या निकषात ६५ उमेदवार बाद झाले. नंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासली. या पडताळणीनंतर पोलिस भरतीसाठी चारशे, आठशे मीटर धावण्यापासून इतर चाचण्या घेतल्या. पोलिस कवायत मैदानावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता. जिल्हा पोलिस अधीक्षक धिवरे यांनी अल्पोपाहाराची व्यवस्था केली. वैद्यकीय पथक मैदानावर उपस्थित होते.

व्हीडीओ शूटिंग

पहिल्या दिवशी दुपारी बारापर्यंत मैदानी चाचणीची प्रक्रिया संपली. पुढील चार दिवस याच पद्धतीने पोलिस भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. पोलिस भरती पारदर्शकतेने होण्यासाठी सीसीटीव्ही, व्हीडीओ शूटिंगचा आधार घेतला जात आहे. बायोमेट्रीक पद्धतीने प्रत्येक चाचणीनंतर उमेदवारांची हजेरी घेतली जात आहे. त्यामुळे पोलिस भरतीतील गैरप्रकारांना आळा बसला. जिल्हा पोलिस अधीक्षक धिवरे, अपर पोलिस अधीक्षक काळे उपस्थित होते. (latest marathi news)

Candidates running on Wednesday as part of the police recruitment process at the police drill ground.
Police Recruitment : जागा २०२, अर्ज २० हजार; पुणे शहरातील पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात

शैक्षणिक पात्रता व उमेदवार संख्या

बी.ए............................५२६

बी.एस्सी......................१६६

पदव्युत्तर.......................१३८

बी. कॉम........................८०

बी.ई (अभियांत्रिकी)............२२

बी.एस्सी ॲग्री.................१६

बी.सी.ए...........................१३

बी. फार्म.........................१०

बी.एस.डब्लू.......................८

एल.एल.बी.........................३

बी- टेक..........................३

बीसीएस..........................३

बी.बी.ए............................२

बी.बी.एम...........................१

बी.एस्सी (टेक).................१

बी. टेक ॲग्री.....................१

बी.एम.एस..........................१

Candidates running on Wednesday as part of the police recruitment process at the police drill ground.
Police Recruitment : पोलीस भरतीला नाशिकला आलेल्यांची निवासाची सोय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.