Dhule News : माझ्या महाराष्ट्राची कांदा निर्यातबंदी उठवली नाही, गुजरातची मात्र उठवली. गुजरात आणि महाराष्ट्र असा भेदभाव काय करता, असा सवाल करीत गेल्या दोन वेळेला महाराष्ट्राने तुम्हाला ४० पेक्षा जास्त खासदार दिले म्हणून तुम्ही दिल्ली पाहिली. या वेळेला हाच महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही, असा घणाघात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर केला. (Dhule Uddhav Thackeray)
लोकसभा निवडणुकींतर्गत ठाकरे यांची मंगळवारी (ता. ७) दुपारी साडेचारला येथील जेल रोडवर प्रचार सभा झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
भाजपला उद्देशून ठाकरे म्हणाले, की मोदी आम्हाला म्हणाले, की यांची ४ जूनला ‘एक्सपायरी डेट’ आहे. मात्र, तुमचा बुरशी आलेला माल लोकांनी पाहिला आहे. तो ४ जूनला आम्ही केराच्या टोपलीत फेकून देणार आहोत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना या बुरसटलेल्यांना आता ओझं व्हायला लागली आहे.
म्हणून चारशे पारचा नारा देत यांना डॉ. आंबेडकरांनी दिलेली घटना बदलून टाकायची आहे, असा आरोप करीत या राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी त्यांना रोखायचे आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले. येथे आठवड्यानंतर पाणी देणाऱ्यांना पराभवाचे पाणी पाजा, असे आवाहन त्यांनी केले. (latest marathi news)
महाविकास आघाडी सरकार राज्यात असताना शेतमालाला आजपेक्षा जास्त भाव होता की कमी होता, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला केला. त्यावर जास्त होता, असे उत्तर जनतेतून आले. तोच धाका पकडत ठाकरे यांनी गद्दारी फक्त माझ्याशी नाही केली, तर तुमच्याशी, शेतकऱ्यांशी, महाराष्ट्राशी केल्याचे टीकास्त्र सोडले.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका सभेत केलेल्या बहीण-भावाच्या नात्याविषयीचे वक्तव्य, मणिपूरमधील घटना, महिला खेळाडूंचे आंदोलन, कर्नाटकातील रेवण्णा प्रकरण आदी विविध मुद्द्यांवरूनही श्री. ठाकरे यांनी नाव न घेता भाजप, मोदींवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी संविधान वाचविण्यासाठी ही निवडणूक असल्याचे सांगितले. ठाकरे व इतर वक्त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यावर टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.