कापडणे : राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशाचे वितरण सुरू आहे. शाळा सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांनी एकच गणवेश मिळत आहे. दुसरा गणवेश दिवाळीनंतर मिळणार आहे. विद्यार्थ्यांना एकच गणवेश मिळत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दुसरा गणवेश मिळेल का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. (Uniform for students after 3 months from government)