Dhule Unseasonal Rain : शहरासह तालुक्यातील काही भागात शुक्रवारी (ता. २९) अवकाळी पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरण तयार झाले. त्यामुळे असह्य उकाडा सुरू झाला. नंतर पावसाने हजेरी लावली. ढगाळ आणि पावसाळी वातावरण रात्री उशिरापर्यंत कायम राहिल्याने बळीराजा पुन्हा चिंतेत सापडला आहे. दरम्यान, ‘शॉवरिंग’ पाऊस नेमका किती प्रमाणात, कुठे-कुठे झाला ही माहिती उपलब्ध झाल्याशिवाय पिकांच्या नुकसानीबाबत अनुमान लावता येणे शक्य नाही, असे जिल्हा परिषद कृषी यंत्रणेने सांगितले. (Dhule Unseasonal rain in taluk)
साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यात शुक्रवारी थेंबभरही पाऊस झाला नाही. मात्र, धुळे शहर व तालुक्यात सकाळपासून दुपारपर्यंत अधूनमधून अवकाळी पाऊस होत होता. तो शिरूड (ता. धुळे) भागाकडून आला. त्यामुळे तालुक्यातील काही भागात तो बरसला. दिवसभरात सूर्यदेवाचेही दर्शन झाले नाही. अशात ढगाळ वातावरण कायम राहिले तर जी लहान पिके आहेत, त्यांना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, अशी भीती कृषी यंत्रणेने व्यक्त केली.
काढणीतील पिके निघाली
काढणीतील गहू बऱ्यापैकी काढणी झाला आहे. भाजीपाला आणि कांद्याची काढणी राहिली आहे. असे असले तरी अवकाळी पाऊस धुळे तालुक्यात नेमका किती भागात व किती प्रमाणात झाला याची माहिती उपलब्ध झाल्याशिवाय पिकांच्या नुकसानीचे अनुमान बांधता येणार नाही, असेही कृषी यंत्रणेने सांगितले.
अनपेक्षित बदल
अवकाळी पावसामुळे काही भागात कोरडा चाराही ओला झाला. अशा पावसामुळे फुलशेतीला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली. शहरासह जिल्ह्याचे तापमान दोन दिवसांपासून सरासरी ४१ अंशांवर गेले. (latest marathi news)
भरदुपार रस्त्यावर संचारबंदीसारखी स्थिती अनुभवास मिळते आहे; परंतु शुक्रवारी वातावरणात अनपेक्षित बदल झाला. ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट झाला. काही वेळाने शहरात मोठ्या सरींनी पाऊस सुरू झाला. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. पथारी व्यावसायिकांना आपापले साहित्य सुरक्षित करताना कसरत करावी लागली. पावसाच्या भागात शेतकऱ्यांनी प्लॅस्टिक कागद अंथरून चारा, काढणीतील शेतमाल सुरक्षित केला.
उकाड्यात असह्य वाढ
ढगाळ व पावसाळी वातावरण कायम राहिल्याने शुक्रवारी उकाडा असह्य होऊ लागला. गुरुवारी मध्यरात्रीपासून उकाड्यात कमालीची वाढ झाली. अशा वातावरणामुळे एसी, कूलर वापरण्यास मोठ्या प्रमाणावर सुरवात झाली आहे. एसी, कूलरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. धुळेकर उकाड्यातून सुटका होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.