Dhule News : धुळ्यातील 9 मान्यवरांसह संस्था पुरस्कारांचे ‘मानकरी’; सामाजिक न्याय विभागातर्फे विविध पुरस्कार

Dhule : धुळे शहर व जिल्ह्यातील नऊ मान्यवरांसह एक संस्था या पुरस्कारांचे मानकरी ठरले.
Award
Award esakal
Updated on

Dhule News : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागातर्फे २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ वर्षांकरिता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण’, ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’, ‘कर्मवारी पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड’, ‘संत रविदास’, ‘शाहू-फुले-आंबेडकर पारितोषिक’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य’ आदी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. (Dhule Various awards by Department of Social Justice to institutes and 9 dignitaries)

धुळे शहर व जिल्ह्यातील नऊ मान्यवरांसह एक संस्था या पुरस्कारांचे मानकरी ठरले. व्यक्तीसाठी १५ हजार, तर संस्थेसाठी २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १२ मार्चला मुंबईत पुरस्कारांचे वितरण होईल. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती कल्याण.

शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी आदी तसेच समाजकल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करावा, सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या समाजसेवकांच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी.

जेणेकरून सामाजिक उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत, यासाठी शासनाने १९७१-७२ पासून व्यक्तींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार/समाजभूषण पुरस्कार योजना सुरू केली आहे. १९८९ पासून संस्थांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. दर वर्षी ५१ व्यक्‍ती व १० संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

त्यानुषंगाने पुरस्कारासाठी गठीत मुख्यमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या चार वर्षांकरिता सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची व सामाजिक संस्थांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड केली. त्यानुसार निवड झालेल्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली.

Award
Dhule Crime: गुंगीकारक औषधांची कारमधून विक्री! LCBकडून एकाला अटक; पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

पुरस्कारप्राप्त मान्यवर, संस्था

-२०१९-२० साठी ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार- शशिकांत राजाराम वाघ (चंदननगर, देवपूर धुळे), कैलास आधार चौधरी (गल्ली नंबर-४, पाचकंदील, चैनी रोड कॉर्नर, धुळे), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार- रामदास चिंधू जगताप.

-२०२०-२१ साठी ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार- जोसेफ लॉरेन्स मलबारी (मिशन कंपाउंड, साक्री रोड, धुळे), सुरेश सोनराज पारख (कासारे, ता. साक्री), राजेंद्र नामदेव जिरेकर (ऊस गल्ली, धुळे).

-२०२१-२२ साठी ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार- मोहन चिंतामण मोरे (गल्ली नंबर-७, देवपूर, धुळे), भिवसन रामदास अहिरे (गुरुकृपानगर, चितोड रोड, धुळे), मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था (ओमनगर, आकाशवाणी केंद्रामागे, धुळे).

२०२२-२३ साठी ः साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार- यशवंत दोधू कांबळे.

Award
Dhule News: शासनाच्या विविध योजनांतून आदिवासींच्या विकासाला मदत : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.