Dhule Vidhan Sabha : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडीत जागा कुठल्या पक्षाला सुटते, त्यांच्यासह इतर पक्षांकडून रिंगणातील उमेदवार कोण याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित झाला असला तरी महायुती, महाविकास आघाडीने जागा वाटप, अंतिम उमेदवार निवडीबाबत `सस्पेन्स` कायम ठेवला आहे. त्यामुळे रंगतदार चर्चा, अफवांना ऊत येत आहे. जिल्ह्यातील जागा वाटप आणि उमेदवारीविषयी इच्छुकांसह धुळेकरांचे लक्ष दिल्ली, मुंबईतून होणाऱ्या निर्णयाकडे लागले आहे. (Dhule Vidhan Sabha election 2024 Confusion over seat allocation)