Dhule Vidhan Sabha Election 2024 : वाटाघाटीतून उत्तर महाराष्ट्रात 2 जागांची वाढ शक्य; भाजपच्या मुंबईतील बैठकीत सूर

Vidhan Sabha Election : केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव व मान्यवरांनी पक्षाचे मताधिक्य वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन केले.
Vidhan Sabha Election 2024 BJP
Vidhan Sabha Election 2024 BJPesakal
Updated on

धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील वाटाघाटीतून उत्तर महाराष्ट्रात भाजपसाठी दोन जागांची वाढ होण्याची शक्यता असेल, असे सांगत केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव व मान्यवरांनी पक्षाचे मताधिक्य वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन केले. तथापि, `त्या` दोन जागा कुठल्या हे स्पष्ट न केल्याने `सस्पेन्स` वाढला आहे. भाजपची मुंबईत मंगळवारी (ता. ८) रात्री प्रदेशस्तरीय बैठक झाली. (Increase of 2 seats in North Maharashtra is possible through negotiation BJP )

केंद्रीय सहसंघटनमंत्री शिव प्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. येथून केंद्रीय माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपचे शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, शहर विधान क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, जिल्हा सरचिटणीस ओम खंडेलवाल, यशवंत येवलेकर, जितेंद्र चवटीया, चेतन मंडोरे, संदीप बैसाणे उपस्थित होते.

धोरण्यावरच चर्चा

बैठकीत भाजपची ध्येय- धोरणे व विधानसभा निवडणूक याविषयावर चर्चा झाली. यात संघटनात्मक काम कसे हवे. भाजपची मते वाढविण्यासाठी काय करावे लागेल आणि कार्यकर्त्यांनी कसे योगदान दिले पाहिजे, भाजपची मते वाढवून उमेदवार जिंकण्यासाठी कशी रणनीती असावी आदी मुद्यांआधारे उपस्थित नेत्यांनी उपाययोजनांचा परामर्श घेतला.

कार्यकर्त्यांनी आपले उमेदवार जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी. ताकद पणाला लावावी. भाजप पक्षावर जनतेचा विश्‍वास कसा वाढेल यादृष्टीने कार्य करावे, अशी सूचनाही नेत्यांनी उपस्थितांना दिली. भाजपच्या जागा किती व कशा, कुठे असतील, उमेदवार किती व कोण असेल याविषयी माहिती बैठकीत देण्यात आली नाही. (latest marathi news)

Vidhan Sabha Election 2024 BJP
Dhule Vidhan Sabha Election 2024 : साक्री मतदारसंघ निवडणुकीपूर्वीच लक्षवेधी; भाजपच्या खेळीकडे सर्वांचेच लक्ष

तीन मतदारसंघात पसंतीक्रम

भाजपने धुळे ग्रामीण, शिंदखेडा, शिरपूर मतदारसंघासाठी पक्षीय निरीक्षक पाठविले. त्यात धुळे ग्रामीणमध्ये १५१ सदस्यांचे पसंतीक्रमावर मतदान घेण्यात आले. एकूण १५१ सदस्यांमध्ये या मतदारसंघातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, विविध सेलचे प्रमुख, जिल्हा, विभाग, प्रदेश कार्यकारिणीतील सदस्य, परंतु या मतदारसंघात वास्तव्यास असलेल्यांचा समावेश होता.

प्रत्येकाकडून एका चिठ्ठीवर धुळे ग्रामीणमधील पसंतीच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकानुसार इच्छुक उमेदवाराचे नाव लिहून घेण्यात आले. नंतर बंद पाकिटाव्दारे चिठ्ठी प्रदेश कोअर कमिटीकडे जमा झाली. याप्रमाणे शिंदखेडा, शिरपूर मतदारसंघात प्रक्रिया राबविण्यात आली. राज्यात एकाच दिवशी, एकाच वेळी याच पद्‌धतीने ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

...तर धुळ्याची जागा भाजपला का नाही?

भाजपने पसंतीक्रमातील इच्छुक उमेदवार प्रक्रियेत धुळे शहर व साक्री मतदारसंघासाठी पक्षीय निरीक्षकांची नेमणूक केली नाही. परिणामी, या दोन मतदारसंघाची जागा शिवसेनेला (शिंदे गट) सुटल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. त्यात धुळे शहराची जागा भाजपला सुटण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रदेश नेते स्थानिक अस्वस्थ कार्यकर्त्यांना देत आहेत. भाजपचे धुळे शहरात सर्वाधिक ५४ नगरसेवक, शिवसेनेचा एकही नगरसेवक नसताना या मतदारसंघाची जागा भाजपला का सुटू शकत नाही, असा कार्यकर्त्यांचा प्रश्‍न आहे.

Vidhan Sabha Election 2024 BJP
Dhule Vidhan Sabha Election 2024: धुळे शहराची जागा शिवसेना शिंदे गटाला! भाजपच्या गोटात चिंता; विविध समीकरणे बदलण्याची चिन्हे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.