Dhule News : शाळेसाठी विद्यार्थ्यांची दहा किमी पायपीट; हिसपूर-आच्छीची पाच वर्षांपासून स्थिती

Dhule : शिंदखेडा तालुक्यात शिक्षकांची असंख्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
Protesters Shanabhau Sonawane while presenting problem before Shubham Gupta in Zilla Parishad.
Protesters Shanabhau Sonawane while presenting problem before Shubham Gupta in Zilla Parishad.esakal
Updated on

Dhule News : शिंदखेडा तालुक्यात शिक्षकांची असंख्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय हिसपूर-आच्छी गावात पाच वर्षांपासून एसटी किंवा मानव विकास मिशन योजनेतील बस जात नाही.

त्यामुळे तेथील विद्यार्थी दहा किलोमीटर पायपीट करत शाळेत जातात, अशी गंभीर तक्रार करीत शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे यांनी जिल्हा परिषदेत शुक्रवारी (ता. २३) ‘सीईओ’ शुभम गुप्ता यांच्या दालनाला कुलूप ठोकले.(no bus facility students walk ten kilometers to school)

त्या वेळी आंदोलकांनी गुप्ता यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला. आंदोलनात कलमाडीचे सरपंच विजेंद्र झालसे, रावसाहेब ईशी आदींसह विद्यार्थी, विद्यार्थिनीही सहभागी झाले होते. त्यांच्यासह सोनवणे द्वयींनी सीईओंना मागण्यांचे निवेदनही दिले. त्याचा आशय असा ः शिंदखेडा पंचायत समितीत बरेच पद रिक्त आहेत.

अनेक अधिकारी प्रभारी आहेत. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरून पंचायत समितीचे कामकाज सुरळीत करण्यात यावे. विरदेल शिवारात अल्पवयीन मुलीचा खून झाला. नंतर तिचा मृतदेह गोणीत आढळल्याने भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत मुला-मुलींमधील भीतीचे वातावरण निवळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनानेही उपाययोजना कराव्यात.

विविध मागण्या

शिंदखेडा तालुक्यातील काही शिक्षक मद्यपान करून वर्गात शिकवितात. हे अच्छे दिन म्हणावे का? एखाद्या शाळेत पाच विद्यार्थी असताना दोन शिक्षक आणि ५४ विद्यार्थी असताना एकही शिक्षक नाही, अशा गंभीर स्थितीवर केव्हा योग्य पावले उचलली जाणार? शिक्षक नसलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शाळा बंद ठेवली जात असते.

Protesters Shanabhau Sonawane while presenting problem before Shubham Gupta in Zilla Parishad.
Dhule News : डायल 112 ला प्रतिसाद न देणाऱ्यांचे वाजविले बारा; 4 पोलिस निरीक्षक ‘कंट्रोल’ला ‘ॲटॅच’

तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या चार ते पाच वर्षांपासून सिंचन विहिर योजनेचा लाभ मिळाला नाही. तालुक्यात तीन हजार प्रकरणे असताना सत्ताधारी गटातील २६२ जणांना विहीर दिल्याचा इतर शेतकऱ्यांचा आरोप आहे.

नरडाणा एमआयडीसीत एका कंपनीच्या रेल्वे लाइनसाठी २५ शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याला वेगळा दर आणि २४ शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत, अशी विसंगती असेल तर हा ‍प्रश्‍न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शासनाला यथोचित ठराव पाठवून सर्व शेतकऱ्यांना समान मोबदला दिला जावा, अशी मागणी निवेदनात नमूद आहे.

देवरे, गुप्ता यांचे आश्‍वासन

सीईओंच्या दालनाला कुलूप ठोकल्यानंतर आंदोलक सोनवणे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, सीईओ गुप्ता यांनी जाणून घेतली. आचारसंहितेपूर्वी आंदोलकांच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन अध्यक्षा देवरे, सीईओ गुप्ता यांनी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

Protesters Shanabhau Sonawane while presenting problem before Shubham Gupta in Zilla Parishad.
Dhule News : मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्या; गायकवाड यांचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()