Dhule Monsoon Rain: पावसाच्या सरीवर सरी... पण जलस्तरासाठी मुसळधारेची प्रतीक्षा! साक्री, शिंदखेडा तालुक्यांवर वरुणराजा रुसला

Dhule News : जिल्ह्याची सरासरी ५७१ मिलिमीटर असताना आतापर्यंत केवळ ४०७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धुळे जिल्ह्याला नेहमीच दुष्काळाचे ग्रहण लागले आहे असे म्हटले जाते.
While inspecting the mung crop in the state-sponsored Integrated Value Chain Development and Productivity Enhancement Project in Shivarat, Divisional Joint Director of Agriculture R. B. move
While inspecting the mung crop in the state-sponsored Integrated Value Chain Development and Productivity Enhancement Project in Shivarat, Divisional Joint Director of Agriculture R. B. moveesakal
Updated on

म्हसदी : मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्प नक्षत्र संपत आले असून, शुक्रवार (ता. २)पासून आश्लेषा नक्षत्र सुरू झाले. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी धुळे जिल्ह्यात अपवाद वगळता जोरदार पावसाअभावी ‘पाणीबाणी’ संपली नसल्याचे चित्र आहे.

अजूनही बारीक सरी अन् अधूनमधून येणाऱ्या पावसावरच खरिपाचे पिके बहरली आहेत. अर्थात विहिरींच्या पाण्याच्या पातळीवाढीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. शिवाय नदी, नाले, ओढे कोरडेठाक असल्याने जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. (Dhule wait for heavy mosnoon rain for water level)

जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा या तालुक्यांवर नेहमीच पाऊस रुसलेला असतो. भौगोलिकदृष्ट्या विभाजन, पर्जन्यछायेचा प्रदेश आणि पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन यासह विविध भौगोलिक कारणांमुळे पावसाचे स्वरूप बदलत आहे. यंदाही कुठे जास्त, तर कमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची सरासरी ५७१ मिलिमीटर असताना आतापर्यंत केवळ ४०७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धुळे जिल्ह्याला नेहमीच दुष्काळाचे ग्रहण लागले आहे असे म्हटले जाते.

कागदावरची आकडेवारी फुगलेली

जुलै ते सप्टेंबर अर्थात वार्षिक सरासरीच्या तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये ७८ ते ५९ टक्के पाऊस पडला आहे. याउलट जून ते जुलैचा विचार केला तर जिल्ह्यात तब्बल ७१ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. अद्यापही अपवाद वगळता मुसळधार पाऊस नसला तरी सरीवरच कागदावरचे आकडे फुगत असून, खरा पाऊस किती झाला हा यक्षप्रश्न शिल्लक राहतो.

यंदा पावसाने रिपरिप का होईना बऱ्यापैकी सातत्य ठेवल्याने खरीप पेरण्या लवकर झाल्या आहेत. पीक परिस्थिती बऱ्यापैकी असली तरी वाढलेले तण, पिकांवरील कीटकांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी त्रस्त आहे. दुसरीकडे जलस्तर वाढीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. (latest marathi news)

While inspecting the mung crop in the state-sponsored Integrated Value Chain Development and Productivity Enhancement Project in Shivarat, Divisional Joint Director of Agriculture R. B. move
Malegaon Flood Rescue: मालेगावमध्ये पुरात अडकले होते पर्यटक; हेलिकॉप्टरद्वारे थरारक रेस्क्यू, 15 जणांना वाचवलं

रविवार (ता. ४)पर्यंतचा पाऊस

तालुका‌ वार्षिक पर्जन्यमान पडलेला पाऊस टक्के

धुळे‌ : ५५५.२ ‌ ४१९.९ ७५.६३

साक्री : ५०५.९ ३९५.९ ७८.२५

शिरपूर : ‌ ‌ ५३१.२ ३८५.७ ७२.६०

शिंदखेडा : ७०१.३ ४२०.७ ५९.९८

जिल्हा सरासरी : ५७१ ‌ ४०७.३ ७१.३

"यंदा बऱ्यापैकी पावसाने सातत्य ठेवल्याने सध्या खरीप पिके तरारली असून, जलस्तरवाढीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. शिरपूर व साक्री तालुक्यात अजूनही जोरदार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाने सरासरी गाठली आहे. जून ते ऑगस्टपर्यंत धुळे १४२.९, साक्री १४५.२, शिरपूर १०२.१, तर शिंदखेडा १४४ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात १३३.६ टक्के पाऊस झाला आहे."

- के. आर. शिरसाठ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे

While inspecting the mung crop in the state-sponsored Integrated Value Chain Development and Productivity Enhancement Project in Shivarat, Divisional Joint Director of Agriculture R. B. move
Nashik Monsoon Rain Update : पालखेड पाठोपाठ पुणेगांव धरण 80 टक्के भरले; धरणातून विसर्ग सुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.