सोनगीर : धुळे जिल्ह्यात मार्चमध्येच अनेक गावांना पाणीटंचाई जाणवत असून, ती दूर करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केली जात आहे. जिल्ह्यातील ६४ गावे व दोन वाड्यांना तीव्र पाणीटंचाईमुळे ६६ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून, पाच गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या एकही मोठी योजना प्रस्तावित नाही. त्यामुळे जुन्या, गळक्या योजनांवरच पाणीपुरवठा अवलंबून आहे. (Dhule Water Crisis Wells acquired for 66 villages in Dhule district Water supply depends on old weak schemes marathi news)
जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पाचे पाणी झपाट्याने खाली उतरत असल्याने एप्रिल ते जूनदरम्यान पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. विहिरी, कूपनलिका आदी स्रोतही आटत आहेत. पाणीटंचाईसह चाराटंचाईलाही सुरवात झाली आहे. धुळे जिल्ह्यात सध्या सुमारे एक लाख २० हजार ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसली आहे.
त्यांपैकी शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ५३ गावांना पाणीटंचाई असून, शिरपूर तालुक्यात एकाही गावाला पाणीटंचाई नाही. आमदार अमरिशभाई पटेल व शिरपूरचे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केलेल्या जलविकास योजनांमुळे शिरपूर तालुका पाण्याबाबत स्वयंपूर्ण आहे.
जिल्ह्यातील मुख्य व मोठ्या नदीला बारमाही पाणी असल्याने शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील तापी नदीकाठावरील गावांना पाणीटंचाई नाही. धुळे तालुक्यातील दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्याचा लाभ दोन हजार ६७६ ग्रामस्थांना होतो.
शिंदखेडा तालुक्यातील तीन गावांतील सात हजार ७०३ ग्रामस्थांना टँकरने पाणी मिळते. साक्री तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा होत नाही. सध्या सात हजार ३७९ ग्रामस्थ टँकरवर अवलंबून आहेत. धुळे जिल्ह्यातील ६४ गावे व दोन वाड्यांतील एक लाख १२ हजार ३३५ लोकवस्तीला विहिरी अधिग्रहीत करून पाणीपुरवठा केला जात आहे. (latest marathi news)
धुळे तालुक्यातील आठ गावे, साक्री तालुक्यातील सहा गावे व दोन वाड्या, शिंदखेडा तालुक्यातील ५० गावांना विहिरी अधिग्रहीत करून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. धुळे तालुक्यातील १६ हजार ९११, साक्री तालुक्यातील १२ हजार ८१२, शिंदखेडा तालुक्यातील ८२ हजार ६१२ लोकांना विहीर अधिग्रहणातून दिलासा देण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे.
तालुका गावे टॅंकर अधिग्रहीत विहिरी
१) धुळे १० २ ८
२) साक्री ८ ० ८
३) शिंदखेडा ५३ ३ ५०
४) शिरपूर ० ० ०
---------------------------------
एकूण ७१ ५ ६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.