Dhule Water Supply : अमृत-२ अंतर्गत धुळे शहरात प्रारंभी १७ हजार वॉटर मीटर बसविण्यात येणार आहेत. हे काम येत्या १५-२० दिवसांतच सुरू होणार आहे. त्यादृष्टीने तयारी पूर्णत्वाकडे आहे. वॉटर मीटर बसविण्याचे हे काम नंतर पुढेही सुरू राहणार असल्याने येत्या काळात घराघरांत वॉटरमीटर लागतील व भविष्यात चोवीस तास नागरिकांना पाणी मिळू शकेल अशी अपेक्षा आहे. (Water meter work in city)