Dhule Water Scarcity : एप्रिलअखेरपर्यंत धुळेकरांना चौथ्या दिवशी पाणी; पाण्याच्या कमतरतेमुळे नियोजन

Dhule News : यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने जलस्रोतांमध्ये दिवसेंदिवस पाणी कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने धुळे शहराचा पाणीपुरवठा दोनऐवजी तीन दिवसांआड केला आहे.
Water Scarcity
Water Scarcity esakal
Updated on

Dhule News : यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने जलस्रोतांमध्ये दिवसेंदिवस पाणी कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने धुळे शहराचा पाणीपुरवठा दोनऐवजी तीन दिवसांआड केला आहे. अर्थात तिसऱ्या दिवशी होणारा पाणीपुरवठा आता चौथ्या दिवसावर गेला आहे. एप्रिलअखेरपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर पुढील नियोजन ठरेल.(Dhule Water Scarcity)

त्यामुळे अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असली, तरी धुळेकरांचे दररोज पाणीपुरवठा, दिवसाआड पाणीपुरवठ्याचे स्वप्न किमान पावसाळ्यापर्यंत दूरच राहणार आहे. धुळे शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न गेल्या अनेक निवडणुका गाजवून गेला. अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा मुद्दाही प्रत्येक निवडणुकीचा मुद्दा होता. दरम्यान, १६९ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.

या योजनेचे काम सुरू झाले. अनेकदा योजना कार्यान्वितचे मुहूर्त निघाले. शेवटी योजना प्रत्यक्षात कार्यान्वित झाली आणि धुळेकरांचे वर्षानुवर्षांचे एक स्वप्न पूर्ण झाले. योजना पूर्ण होऊन कार्यान्वित झाली असली, तरी निवडणुकीत योजनेचा मुद्दा कायम राहणार आहे. यापूर्वी अक्कलपाडा पाणीयोजना करणार असा मुद्दा होता, आता योजना पूर्ण केल्याचा मुद्दा असेल. त्यामुळे निवडणुकीतून योजना अजून काही वर्षे जाणार नाही हे नक्की.

चौथ्या दिवशी पाणी

अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असली, तरी धुळेकरांना रोज पाणी मिळेल, किमान दिवसाआड पाणी मिळेल हे स्वप्न मात्र पूर्ण झालेले नाही. या वर्षी कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची स्थिती आहे. जलस्रोतांमधील पाण्याची पातळी खाली जात आहे. यापूर्वी शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव यंदा कोरडाठाक पडला आहे. (latest marathi news)

Water Scarcity
Dhule News : धुळे 28, नंदुरबारला 21 हजार ‘आधार इनव्हॅलिड’

जसजसा उन्हाळा पुढे सरकेल तशी जलस्रोतांमधील पाण्याची पातळी कमी होत जाणार आहे. त्यामुळे जूनपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. या आव्हानामुळे धुळेकरांच्या पाणीपुरवठ्यासाठी एक दिवस वाढ करण्यात आली आहे. अर्थात तिसऱ्या दिवशी होणारा पाणीपुरवठा आता चौथ्या दिवसावर नेला आहे. परिणामी दररोज, दिवसाआड पाणी मिळण्याचे स्वप्न पुन्हा पुढे ढकलले गेले आहे.

रोज ७८ एमएलडी पाणी

-अक्कलपाड योजनेतून.....४० एमएलडी

-तापी योजनेतून..............३७ एमएलडी

-डेडरगाव तलावातून........एक एमएलडी

"जूनमध्ये पाऊस झाला नाही तर समस्या निर्माण होऊ नये, यादृष्टीने धुळे शहराचा पाणीपुरवठा दोनऐवजी तीन दिवसांआड केला आहे. एप्रिलअखेरपर्यंत याच नियोजनाप्रमाणे पाणीपुरवठा होईल. जलस्रोतांमधील पाण्याची पातळी लक्षात घेऊन पुढील नियोजन होईल. पुरेसे पाणी असल्यास पुन्हा एक दिवस कमी करून तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा होऊ शकेल."-नवनीत सोनवणे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा, मनपा, धुळे

Water Scarcity
Dhule Lok Sabha Election : धुळे लोकसभेसाठी कॉंग्रेसतर्फे 2 नवीन नावांची चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.