Dhule News : यंदा पाऊस कमी झाल्याने विशेषतः उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण होणार हे निश्चित होते. त्याचा प्रत्यय आता दृश्य स्वरूपात पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र आहे. धुळे शहरवासीयांनाही याचे चटके बसण्यास सुरवात झाली आहे. जसजसा उन्हाळा पुढे सरकेल तशी तीव्रता वाढत जाणार आहे. (Dhule Water Scarcity Planning by Municipality to cope with possible water scarcity)
दरम्यान, संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेकडून नियोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध सूचना केल्या. पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्यासाठी धुळेकरांची कसरत सुरू झाली आहे.
वापराच्या पाण्यासाठी असलेल्या विहिरी व बोअरवेल्समधील पाण्याची पातळी खाली गेल्याने पाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, धुळे शहरात महापालिकेकडून नियोजनाप्रमाणे सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही व पूर्तता करण्यात येत आहे.
उन्हाळ्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी आयुक्त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांनी संबंधित विभागप्रमुखांची महापालिकेत बैठक घेऊन याबाबत युद्धपातळीवर काटेकोर नियोजनाचे आदेश दिले. (latest marathi news)
मृतसाठा उचलण्याची तयारी
यात डेडरगाव तलाव येथून मोहाडी उपनगर, अवधान व हिरे मेडिकल कॉलेज आदी भागात पाणीपुरवठा करण्यात येतो. सद्यःस्थितीत पाणीसाठा लक्षात घेता संभाव्य उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. यात डेडरगाव तलावातील गाळ काढण्याची कार्यवाही सुरू आहे.
तसेच तलावातील इनटेक वेलची चारी स्वच्छ करण्यात आली असून, त्यामुळे तेथील चारही खिडक्या मोकळ्या झाल्या आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास तलावातील अतिरिक्त मृतसाठा उचलण्याकरिता पंपाची व्यवस्था करण्यात आली आहे.
चारी खोलीकरण
सद्यःस्थितीत धुळे शहराच्या बहुतांश भागाला अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान, अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडल्याने प्रकल्पात सद्यःस्थितीत कमी पाणीसाठा लक्षात घेता प्रकल्पातील अॅप्रोच चॅनलचे (चारी) खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येत आहे.
तापीवर गळती दुरुस्ती
तसेच तापी योजनेचे तीन पंप सुरू असून, आवश्यकता भासल्यास ४५० एचपीचा पंप राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच योजनेच्या पाइपलाइनवरील लिकेजेस काढण्याचे कामही सुरू असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
नागरिकांना आवाहन
शहरासाठी आवश्यक तो पाणीसाठा उपलब्ध असून, सद्यःस्थितीत नियोजनाप्रमाणे सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच भविष्याच्या दृष्टीनेही आवश्यक ती उपाययोजना व कार्यवाही सुरू आहे. मात्र, संभाव्य पाणीटंचाईचे सावट लक्षात घेता नागरिकांनी पाणी जपून वापरावे, पाण्याचा अपव्यय टाळावा, नळांना तोट्या बसवाव्यात, असे आवाहन धुळे महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
यांच्याशी साधा संपर्क
पाणीपुरवठा नियोजनाकरिता कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे (मो. ९७०२०७९१९७), सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले (मो. ९४२२९६२०९), शाखा अभियंता एन. के. बागूल (मो. ९४२२२९६२१४) व सर्व कनिष्ठ अभियंता प्रयत्नशील आहेत. पाणीपुरवठ्यासंदर्भात काही अडचण असल्यास नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.