Dhule News : जिल्हा परिषदेतून जलरथाला हिरवी झंडी; शासकीय जलयोजना, शाश्‍वत स्रोतांबाबत गावोगावी जागृती

Dhule : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलरथाच्या माध्यमातून प्रचार करण्यात येणार आहे.
Dharti Deore while inaugurating the Jalratha in Zilla Parishad. Neighbor Shubham Gupta etc.
Dharti Deore while inaugurating the Jalratha in Zilla Parishad. Neighbor Shubham Gupta etc.esakal
Updated on

Dhule News : ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा, गावातील पाण्याचे स्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा- २, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजनांविषयी ग्रामस्थांमध्ये जागृती झाली पाहिजे.

त्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलरथाच्या माध्यमातून प्रचार करण्यात येणार आहे. त्यास हिरवी झंडी दाखवून जिल्हा परिषदेतून प्रारंभ करण्यात आला.(Dhule Water Supply and Sanitation Department campaigning through Jagratha)

जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जलरथाचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार.

माजी सभापती महावीरसिंग रावल, संजीवनी सिसोदे, संग्राम पाटील, भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय दुग्गड, प्रा. चंद्रकांत डागा, जिल्हाध्यक्ष जोशीला पगारिया, सचिव सचिन कोठारी, शहराध्यक्ष कीर्तिकुमार ताथेड.

संजय चतुरमुथा, दीपक मुनोत, रमेश बोथरा, अनिल कांकरिया, तुषार चोरडिया, जिल्हा समन्वयक अविनाश मराठे, तालुका समन्वयक प्रा. डागा (शिंदखेडा), भूषण देसले (धुळे), राहुल पगारे (साक्री), विश्वजित महिरे (शिरपूर) उपस्थित होते. (latest marathi news)

Dharti Deore while inaugurating the Jalratha in Zilla Parishad. Neighbor Shubham Gupta etc.
Dhule News : शिवाजीनगर उद्यानात पेव्हर ब्लॉक; 5 लाखांच्या निधीतून काम

राज्यातील ३५१ तालुक्यांतील गावांमध्ये जलरथाच्या माध्यमातून प्रचार करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील चार तालुक्यांत जलरथाद्वारे शासकीय जलसंबंधी योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल.

जलरथाच्या माध्यमातून गावात ऑडिओ जिंगल्स, पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. ग्रामस्थांना माहितीपत्रक दिले जाणार आहे. तसेच नियुक्त समन्वयकांमार्फत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे.

गावातील जलस्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी केली तर शासनाच्या पोर्टलवर तत्काळ ऑनलाइन मागणी करण्यात येईल. भारतीय जैन संघटना या कार्यासाठी तंत्रज्ञानाची मदत व डिमांड जनरेशनसाठी गावोगावी शेतकऱ्यांपर्यंत जागृती करणार आहे.

Dharti Deore while inaugurating the Jalratha in Zilla Parishad. Neighbor Shubham Gupta etc.
Dhule News : जुगलबंदी, ‘हास्यजत्रे’ने उद्या महोत्सव सुरू; पोलिस मैदानावर 5 दिवस ‘महासंस्कृती’ची मोफत मेजवानी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.