Dhule Water Crisis : तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा विस्कळित; देवपूरमधील काही भागाला फटका

Dhule Water Crisis : जिल्ह्यातील काही गावांमध्ये ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या मानाने धुळेकरांना दिलासा आहे.
Dhule Water supply disrupted due to technical problems
Dhule Water supply disrupted due to technical problemsesakal
Updated on

Dhule Water Crisis : जिल्ह्यातील काही गावांमध्ये ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या मानाने धुळेकरांना दिलासा आहे. ऐन उन्हाळ्यात चौथ्या दिवशी पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरात मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने रामनगर जलकुंभावरून ज्या भागाला पाणीपुरवठा होतो. (Dhule Water supply disrupted due to technical problems)

त्या भागाचे वेळापत्रक बिघडले आहे. चौथ्या दिवसाचा पाणीपुरवठा सहाव्या, सातव्या दिवशी गेला आहे. ही समस्याही लवकरच दूर होईल, असा मनपा अभियंत्यांना विश्‍वास आहे. दरम्यान, मोराणे येथील ८०० मिलिमीटर व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवारी (ता. २६) शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार आहे.

धुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर धुळेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तीव्र उन्हाचा तडाखा असताना धुळेकर नागरिकांना चौथ्या दिवशी पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेकडून होत आहे. मात्र, काही तांत्रिक बिघाडांमुळे गेल्या आठवडाभरापासून काही भागात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक चुकले आहे.

विशेषतः रामनगर जलकुंभावरून ज्या भागाला पाणीपुरवठा होतो, त्या भागातील नागरिकांना सहा-सात दिवसांनंतर पाणी मिळत आहे. यामुळे या भागातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. एसआरपी कॉलनी, प्रमोदनगर, वाडीभोकर रोड, प्रभाग दोनमधील तिरुपतीनगर व इतर भागात विलंबाने पाणी मिळत आहे. (Latest Marathi News)

Dhule Water supply disrupted due to technical problems
Dhule News : शिरपूरला पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक! जमावाने माजवली दहशत

व्हॉल्व्ह नादुरुस्तीमुळे समस्या

नगावबारी एमबीआर (मुख्य जलकुंभ) येथील मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह तुटल्याने रामनगर जलकुंभावरून ज्या भागात पाणीपुरवठा होतो, त्या भागात पाणीपुरवठा थोडा लांबल्याचे मनपाचे कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी सांगितले. दरम्यान, एक व्हॉल्व्ह दुरुस्त झाला असून, दुसऱ्या व्हॉल्व्हचे कामही लवकरच होईल, त्यामुळे शुक्रवारी (ता. २६) सायंकाळपर्यंत ही समस्या दूर होईल, असेही त्यांनी नमूद केले.

एक दिवस पाणी बंद

मोराणे येथील ८०० मिलिमीटर व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी धुळे महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे धुळे शहराच्या संपूर्ण भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी व धुळे महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

अक्कलपाडा अन् तापी धुळेकरांची तहान भागविणार

उन्हाळा जसजसा पुढे जात आहे व तापमानाचा पारा चाळिशीपार असल्याने पाण्याची गरज अधिक वाढली आहे. दुसरीकडे जमिनीतील पाण्याची पातळी खोल-खोल जात असल्याने विशेषतः ग्रामीण भागात चिंता वाढत आहे. त्या तुलनेत धुळेकर नागरिकांना दिलासा आहे. अक्कलपाडा प्रकल्प व तापी योजनेद्वारे जूनअखेरपर्यंत धुळेकरांची भागेल.

असा विश्‍वास मनपा अधिकाऱ्यांना आहे. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक थोडेफार इकडे-तिकडे होण्याची शक्यता असेल पण घराघरांपर्यंत पाणी पोचेल, अशी अपेक्षा आहे. सद्यःस्थितीत अक्कलपाडा प्रकल्पातून ५० टक्के व तापी योजनेद्वारे ५० टक्के शहरवासीयांची तहान भागत आहे.

Dhule Water supply disrupted due to technical problems
Dhule Lok Sabha Constituency : काँग्रेसच्या नाराज गटाकडून तिसऱ्या पर्यायाला सुरूंग!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.