Dhule News : शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्याची गाडी रुळावर येत नाही तोच पुन्हा ती घसरत असल्याचा प्रकार थांबता थांबेना अशी स्थिती आहे.
आता पुन्हा एकदा तापी योजनेवरील बाभळे जलशुद्धीकरण केंद्र येथे लिकेज दुरुस्तीचे काम मंगळवारी (ता.२०) हाती घेण्यात आले आहे.
त्यामुळे मंगळवारी देवपूर भागाला होणारा पाणीपुरवठा आता एक दिवस उशिरा होणार आहे.(Dhule Water Supply One day late water supply to Devpur area Dhule News)
शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असलेल्या तापी पाणीपुरवठा योजनेवर वर्षभर संकटे येत असतात. कधी जलवाहिनी फुटली तर कधी गळती लागली तर कधी व्हॉल्व्ह खराब तर कधी वीजपुरवठा खंडित असे एक ना अनेक कारणांनी योजनेवरील पाणीपुरवठा विस्कळित होतो. आता उन्हाळ्यात तर अशा समस्यांची मालिकाच सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महावितरण कंपनीने शट डाउन घेतल्याचे निमित्त साधत महापालिकेने योजनेवर दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यानंतर पाणीपुरवठ्याची गाडी घसरल्याने मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या तक्रारी, आंदोलने अद्याप संपलेले नाहीत. पाणीपुरवठ्याची ही गाडी सुरळीत करण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी प्रयत्न करत असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे गाडी रुळावर येणार तोच आता मंगळवारी (ता.२०) तापी योजनेवरील बाभळे जलशुद्धीकरण केंद्र येथे लिकेज दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.
त्यामुळे दुपारी बारानंतर तापी योजनेवर शटडाऊन घेण्यात येणार आहे. या शटडाऊनमुळे शहराच्या देवपूर भागात मंगळवारी होणारा पाणीपुरवठा आता एक दिवस उशिराने होणार असल्याचे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.
तापी योजनेवरून एक दिवस उशिरा पाणीपुरवठा झाल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्याचे पुढील संपूर्ण नियोजन पुढे ढकलले जाते. अर्थात ते एका अर्थाने विस्कळित होते. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल असे दिसते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.