Water Supply News : सुरळीत पाणीपुरवठ्यात अडथळ्यांची मालिका

Water Supply News
Water Supply Newsesakal
Updated on

Dhule News : विविध कारणांनी विस्कळीत झालेला शहराचा पाणीपुरवठा काहीकेल्या रुळावर येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी होत असलेल्या विविध उपाययोजनादेखील एका अर्थाने अडथळे ठरताच अशी स्थिती आहे.

आता तापी पाणीपुरवठा योजनेवरील सुकवद पंपिंग स्टेशन येथे रविवारी (ता. ४) नवीन पंप बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

त्यामुळे काही जलकुंभांवरून कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. याशिवाय इतर तांत्रिक कारणांनी अशोक नगर जलकुंभावरून एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा होणार आहे. (Dhule Water Supply Status New pump Sukabad station will supply water low pressure series of obstacles to smooth water supply Dhule News)

धुळे शहराचा पाणीपुरवठ्याचा बहुतांश भार तापी पाणीपुरवठा योजनेवर आहे. शहराच्या ६० टक्के भागाला या योजनेवरून पाणीपुरवठा होतो.

मात्र, ही योजना जुनी झाल्याने विविध तांत्रिक अडचणी नेहमीच असतात. अगदी नव्याने काही कामे घ्यायचे ठरले तरी त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. परिणामी पुढील अनेक दिवस पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होते.

सुरळीत पाणीपुरवठ्याची गाडी रुळावर येणार अशी स्थिती असतांनाच नवीन काहीतरी अडथळा उभा राहतो आणि पुन्हा नियोजन कोलमडते. सध्या तीव्र उन्हाचा सामना करणाऱ्या धुळेकरांची पाण्याची गरजही जास्त आहे.

Water Supply News
Dhule News : मनपाचे अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांची बदली; आजच पदभार स्वीकारण्याचा आदेश

मात्र, याचवेळी विविध तांत्रिक अडथळ्यांनी पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कधी लोडशेडींग, कधी वादळ, पावसामुळे वीजपुरवठा खंडीत होणे, कधी जलवाहिनी फुटणे अशा एक ना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

त्यातच काही दिवसांपूर्वी महावितरण कंपनीने शटडाऊन घेतले त्याच दिवशी महापालिकेने बाभळे जलशुद्धीकरण केंद्रासह तापी योजनेवर दुरुस्तीचे कामे हाती घेतली. दुरुस्ती झाली खरी पण विस्कळीत झालेला पाणीपुरवठा रुळावर येत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Water Supply News
Dhule News : पिंपळनेर येथे आढळला दुर्मिळ जातीचा मांजऱ्या साप

कमी दाबाने मिळणार पाणी

तापी पाणीपुरवठा योजनेवरील सुकवद पंपिंग स्टेशन येथे रविवारी (ता.४) नवीन पंप बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे रविवारी शहरातील चक्करबर्डी, जामचा मळा, मायक्रो, दसेरा मैदान, मोहाडी जलकुंभावरून कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या अभियंत्यांनी केले आहे. अर्थात पुन्हा पाण्यासाठी कसरतच करावी लागणार आहे.

एक दिवस उशिरा पाणी

उन्हाळा सुरू असल्याने शहरात बऱ्याच ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे नमूद करत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बजगुजर जलकुंभास हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा होत आहे. तसेच बडगुजर जलकुंभ व अशोक नगर जलकुंभास एकाच जलवाहिनीने पाणीपुरवठा होत असल्याने अशोक नगर जलकुंभावरून काही भागात एक दिवस उशिरा पाणीपुरवठा होऊ शकतो असे महापालिकेने म्हटले आहे.

Water Supply News
Dhule News : घरपट्टीतील मोठी वाढ बेकायदेशीर; माजी उपमहापौर बोरसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.