Dhule News : धुळ्यात पाणपोयांची दुरवस्था! लाखोंचा निधी खर्चूनही नागरिकांच्या घशाला कोरड

Dhule News : शहरात लाखो रुपये खर्चून उभारलेल्या पाणपोयांची दुरवस्था झाली आहे. महापालिका आणि सामाजिक संस्थांनी लक्ष देऊन पाणपोयांची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
water
water esakal
Updated on

Dhule News : शहरात लाखो रुपये खर्चून उभारलेल्या पाणपोयांची दुरवस्था झाली आहे. महापालिका आणि सामाजिक संस्थांनी लक्ष देऊन पाणपोयांची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा पारा सरासरी ४२ ते ४३ अंशांवर गेला आहे. वाढते तापमान लक्षात घेता कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. (Dhule water tank built at cost of lakhs of rupees in city are in bad condition)

साहजिकच नागरिकांनी ठिकठिकाणच्या चौकात असलेल्या पाणपोया सुरू करण्याची मागणी केली. वाढते तापमान लक्षात घेता नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत; परंतु कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना घशाला कोरड पडते.

तहान भागविण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. यात शहरातील सर्वच पाणपोयांची दुरवस्था झाली आहे. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पाणपोया कोरड्या पडून असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. (latest marathi news)

water
Dhule News : ‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये गावठी कट्टे, तलवारी हस्तगत; 72 गुन्हेगारांची झाडाझडती

पाणपोईभोवती सर्वत्र अतिक्रमण झाले आहे. सर्व नळ चोरीस गेले आहेत. शहरातील गिंदोडिया चौक, महापालिकेची जुनी इमारत परिसर तसेच मालेगाव रोड, चाळीसगाव रोड क्रॉसिंग परिसरातील पाणपोयी धूळखात पडल्या आहेत.

महापालिकेसह सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत पाणपोयांची दुरुस्ती करून नागरिकांची तहान कशी भागेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

water
Dhule Lok Sabha Election : मतदार सुलभता केंद्राची स्थापना; कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान कक्षही सज्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()