Wedding Muhurat : आता कुर्यात सदामंगलमला 4 महिने ‘ब्रेक’! आषाढी एकादशीपासून ‘नो मुहूर्त’; आता लक्ष कार्तिकी एकादशीकडे

Dhule News : आता आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत विवाहांना ‘ब्रेक’ लागेल. खानदेशात आषाढी एकादशीपासून विवाह सोहळे पूर्णपणे बंद होतात. कार्तिकी एकादशी तथा तुलसीविवाहापासून विवाहांचा श्रीगणेशा होईल.
Wedding
Wedding esakal
Updated on

कापडणे : खानदेशात कार्तिकी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंत विवाहाचा धुमधडाका सुरू होता. ११, १४ व १५ जुलैला शेवटच्या मोठ्या मुहूर्तावर विवाहाचा योग अनेकांनी साधून घेतला. आता आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत विवाहांना ‘ब्रेक’ लागेल. खानदेशात आषाढी एकादशीपासून विवाह सोहळे पूर्णपणे बंद होतात. कार्तिकी एकादशी तथा तुलसीविवाहापासून विवाहांचा श्रीगणेशा होईल. (Wedding 4 month break No Muhurta from Ashadhi Ekadashi)

गेल्या कार्तिकी एकादशीपासून आजच्या आषाढी एकादशीपर्यंत ६१ विवाह मुहूर्त होते. मे महिन्यात गुरूचा अस्त होता. त्यामुळे नोकरदार वर्गाचा मोठा हिरमोड झाला. विवाहेचेछूंना ६१ तिथी साधताना मोठी धावपळ करावी लागली.

या महिन्यात १६ जुलैपर्यंत प्रत्येक दिवस तिथी समजून विवाहेच्छूंनी मुहूर्त साधून घेतला. खानदेशात आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत विवाहाचे मुहूर्त नसतात. या कालावधीला ‘देव बसणे’ किंवा ‘देव झोपले’ असे म्हटले जाते. (latest marathi news)

Wedding
Crime News : हुंड्यासाठी पोटातील बाळाला औषध देवून ठार मारणाऱ्या नवरा व सावत्र मुलाला अटक

चार महिन्यांनंतर ही पहिली तिथी

आषाढी एकादशीनंतर कार्तिकी एकादशी १२ नोव्हेंबरला आहे. १३ नोव्हेंबरला तुलसीविवाह आहे. १३ नोव्हेंबर हा पहिला विवाह मुहूर्त आहे. तोपर्यंत कुर्यात सदा मंगलमला ब्रेकच राहील.

गेल्या वर्षी होते ६१ विवाह तिथी

आजपासून विवाहाच्या तिथी संपल्या आहेत. गेल्या वर्षभरात ६१ विवाह मुहूर्त होते. मेमध्ये गुरूचा अस्त होता. त्यामुळे नोकरदार विवाहेच्छूंचा हिरमोड झाला. आता त्यांचे लक्ष कार्तिकी एकादशीकडे राहणार आहे.

Wedding
Dhule Crime News: बुलढाण्याच्या व्यावसायिकाची छडवेलजवळ सिनेस्टाइल लूट; निजामपूर पोलिसांत 15 जणांविरुद्ध गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.