धुळे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेबद्दल धुळ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वात भर पावसात एकमेकांना पेढे भरवत व ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (Dhule Welcome to Ladki Bahin Yojana Celebration by Shiv Sena)
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना जाहीर झाली. या योजनेंतर्गत २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. जुलै-२०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख मोरे यांच्या संतोषी माता चौकाजवळील जनसंपर्क कार्यालयाजवळ पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिलांनी एकमेकांना पेढे भरवत, फटाके फोडून व ढोल ताशांच्या गजरात या योजनेचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रतिमा असलेले व त्यावर ‘माझा भाऊ लाडका भाऊ’ चे फलक झळकावत मुख्यमंत्री शिंदेंचा जयघोष केला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोरे, महानगरप्रमुख संजय वाल्हे यांनी या योजनेची यावेळी माहिती दिली. आबा कदम, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर, उपमहानगरप्रमुख अजय पाटील, भारती मोरे, मनीषा वाल्हे, वर्षा चौधरी, युवतीसेना जिल्हाध्यक्ष दक्षता पाटील, छाया चाहकर, मयूर सूर्यवंशी, पूनम शेवाळे, धनश्री थोरात, ज्योती पाटील, आशा येवले, ज्योती खरात, उषा जगदाळे, पल्लवी सपकाळ, रेखा सपकाळ, सुनीता सपकाळ, कल्याणी कोळी, अनिता दाभाडे यांच्यासह आदी उपस्थित होते. (latest marathi news)
जनतेपर्यंत योजना पोचवू
माझी लाडकी बहीण योजनेसह सर्वसामान्यांसाठी असलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घेण्याचे आदेश दिल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, महानगरप्रमुख संजय गुजराथी उपस्थित होते.
महाले म्हणाले, की राज्याच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना जाहीर केली. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात मदतीसाठी शिवसेनेचे प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. खात्यात पैसे जमा होईपर्यंत हे प्रतिनिधी लाभार्थी महिलांना मदत करतील.
लाभार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. साक्री तालुका- अजय सोनवणे (९५५२९४९०७२), अमोल बच्छाव (९१५८९२०००८), धुळे तालुका- अनिल महाजन (९४२३४९७९७१), धुळे शहर- आशिष चौधरी (९९७०४१२३९३), प्रसाद महाले (७७६८०६६७४३), शिरपूर तालुका- दिनेश गुरव (९५४५४९८०००), मनोज धनगर (८८०५२७७०००) यांचा यात समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.