Dhule Lok Sabha Election : सर्वत्र गाजावाजा, ग्रामीण भागात मात्र शांतता

Dhule News : लोकसभा निवडणुकीचा सर्वत्र गाजावाजा सुरू असताना ग्रामीण भागात मात्र शांतता आहे. कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद व चर्चा सुरू असून मतदार आपापल्या कामात व्यस्त आहेत.
Dhule Lok Sabha Election
Dhule Lok Sabha Election esakal
Updated on

सोनगीर : लोकसभा निवडणुकीचा सर्वत्र गाजावाजा सुरू असताना ग्रामीण भागात मात्र शांतता आहे. कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद व चर्चा सुरू असून मतदार आपापल्या कामात व्यस्त आहेत. कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संपर्कात भाजपा आघाडीवर असून काँग्रेससह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्याप हवे तसे वातावरण निर्माण झाले नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारणार नाही. (Dhule While buzz of Lok Sabha elections is going on everywhere there is peace in rural areas)

राज्यात पाच टप्प्यात निवडणूक होत असून पहिला टप्पा १९ एप्रिलला तर शेवटचा पाचवा टप्पा २० मे ला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात मतदान असून त्याला अद्याप सुमारे सात आठवडे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पातळीवर ऐनवेळी उमेदवार दिला जाईल अशी चिन्हे आहेत.

भाजपला डॉ. सुभाष भामरे यांच्या इतका तुल्यबळ उमेदवार मिळून न आल्याने त्यांनाच तिसऱ्यांदा संधी देण्यात आली. त्यांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान ग्रामीण भागात लग्नसराई जोरात सुरू आहे. राजकीय बोहल्यावर खासदार होण्यासाठी उमेदवार तीव्र उन्हाची पर्वा न करता फिरत आहेत.

तसेच नवरदेव उन्हाची तमा न बाळगता नवरी मिळावी म्हणून बोहल्यावर चढत आहेत. लग्नसराईमुळे कापड, सोने, भांडी व अन्य बाजारात काहीशी तेजी असल्याने व्यापारीवर्गात लोकसभा निवडणुकीची फारशी चर्चा नाही. शेतकरीवर्गाने शेतातून गुरांसाठी चारा मिळवल्यानंतर नांगरटी, वखरणी, ढेकळे फोडणे आदी कामात व्यस्त आहेत. (latest marathi news)

Dhule Lok Sabha Election
Loksabha Election 2024 : इंदापूर तालुक्यासह हर्षवर्धन पाटील यांचेही पालकत्व स्वीकारतो ; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

बागाईतकर शेतकरी मे मध्येच कापूस लावत असल्याने ते शेती तयार करीत आहेत. लोकसभेची चर्चा क्वचित चावडीवर तेही महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी कोणाला मिळणार येथून चर्चा सुरू होते व त्याच विषयावर संपते.

"आमच्या शेतीमालाला भाव नाही. कांदा, कापूस, उन्हाळी भुईमूग, मकाने रडवले. दर निवडणुकीनंतर शेतकऱ्यांचे दिवस बदलतील असे वाटत असताना काहीच बदल दिसत नाही. त्यामुळे निवडणूक कोणतीही असो आम्हाला काही घेणे देणे नाही. कोणीही निवडला तरी आमचे कष्ट थोडीच दूर होणार." - शांताराम पाटील, शेतकरी, सार्वे ता. शिंदखेडा

Dhule Lok Sabha Election
Loksabha Election 2024 : आरक्षणाची मर्यादा वाढवू ; जाहीरनाम्यातून काँग्रेसचे आश्‍वासन,‘एमएसपी’साठी कायदा करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.