Dhule Summer Heat : ‘एप्रिल’चा तडाखा ‘मे’मध्येही कायम! धुळ्यातील स्थिती

Summer Heat : तापमानाच्या चढत्या पाऱ्याने संपूर्ण एप्रिल धुळेकरांसाठी अत्यंत असह्य ठरला. त्यानंतर आता मेमध्येही हा पारा चढलेलाच असल्याने धुळेकरांना दिलासा नाही.
Dhule Summer Heat
Dhule Summer Heat esakal
Updated on

Dhule Summer Heat : तापमानाच्या चढत्या पाऱ्याने संपूर्ण एप्रिल धुळेकरांसाठी अत्यंत असह्य ठरला. त्यानंतर आता मेमध्येही हा पारा चढलेलाच असल्याने धुळेकरांना दिलासा नाही. धुळ्यातील उन्हाळा घाम फोडणारा, चटके देणाराच असतो. मात्र, चाळिशीपार गेलेला पारा चाळिशीखाली उतरावा, अशी धुळेकरांना अपेक्षा आहे. एप्रिल २०२४ चा विचार केला तर सहा-सात दिवस तापमानाचा पारा चाळिशीखाली होता. इतर दिवशी मात्र तो चाळिशीवर राहिला. ( April was very unbearable for Dhulekars due to rising temperature )

त्यातही दोन दिवस तर अगदी ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा गेल्याने धुळेकरांची कसोटीच लागली.एव्हाना धुळ्यात दर वर्षी उन्हाळा तीव्र असतो. यंदा मात्र जमिनीत पाणीही नाही आणि त्यात तीव्र ऊन असा दुहेरी चटका जिवाची लाहीलाही करत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पशू-पक्ष्यांनाही याचा फटका बसत आहे. नागरिकांना आपापल्या कुटुंबासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीही कसरत करावी लागत आहे. त्यात तापमानाचा चढता पाऱ्याने अधिकच हैराण केले आहे.

चाळिशीपार पारा

एप्रिलमध्ये सुरवातीपासूनच तापमानाचा पारा ४०, ४१, ४२ अंश सेल्सिअस होता. मध्यंतरी सहा-सात दिवस सोडले तर संपूर्ण एप्रिल अशी स्थिती पाहायला मिळाली. चाळिशीपार पारा गेल्यानंतर त्याचा मोठा फटका नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे धुळे शहरातील रस्ते, चौकांत दुपारी अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळाला. (latest marathi news)

Dhule Summer Heat
Dhule Summer Heat : पुढील 3 दिवस उष्णता वाढीचा इशारा!

उच्चांकी तापमान

एप्रिलमध्ये ६ ते १४ एप्रिलदरम्यान सात दिवस ३७ ते ३९ दरम्यान तापमान होते. इतर दिवशी मात्र ४०, ४१, ४२ असेच तापमान अनुभवायला मिळाले. त्यातही १८ एप्रिल कमाल ४३ व किमान २५ तर ३० एप्रिलला कमाल ४३ व किमान २१ अंश तापमानाची नोंद झाली. या ४३ अंश सेल्सिअस तापमानाने धुळेकरांना चांगलाच घाम फोडल्याचे पाहायला मिळाले.

मेमध्येही तडाखा कायम

एप्रिलनंतर मेमध्येही उन्हाचा तडाखा कायम आहे. गेले पाच दिवस धुळे शहरात ४१, ४२ अंश सेल्सिअस तापमान आहे. त्यामुळे एप्रिलनंतर मेमध्येही तीव्र उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागेल अशी चिन्हे आहेत.

गेल्या सहा दिवसांची स्थिती

१ मे...४१.०/२६.०

२ मे...४१.५/२३.०

३ मे...४१.०/१८.४

४ मे...४२.०/२०

५ मे...४२.०/२४.०

६ मे...४२.०/२६.५ अंश सेल्सिअस

Dhule Summer Heat
Dhule Summer Heat : जिल्ह्यात पारा वाढला! दुपारी प्रचार थंडावला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.