कापडणे : एकीकडे माणूसकी, आपुलकी लोप पावत चालली असताना व नात्यांमधील दुरावा वाढत चालला असताना शिंदखेडा तालुक्यातील अजंदे बुद्रुक या छोट्याशा गावात एका गायीचा मृत्यू संपूर्ण गावाला चटका लावून गेला. मानवी चालीरितीप्रमाणे त्या मृत गायीच्या अंत्ययात्रेत अवघा गाव सहभागी झाल्याने माणसातील संवेदना आजही शाबूत असल्याचा प्रत्यय गावकऱ्यांनी अनुभवला. (whole village went to Ajande Budruk for funeral of cow)