Dhule Winter Update: पावसासह जिल्ह्यात बोचऱ्या थंडीचे आगमन! स्वेटर विक्रेत्यांनी शहरात थाटली दुकाने

file photo
file photoesakal
Updated on

धुळे : शहरात बोचऱ्या थंडीला सुरवात झाली आहे. त्यामुळे स्वेटर विक्रेत्यांनी प्रमुख चौकात स्वेटर विक्रीची दुकाने थाटली आहेत.

स्थानिक विक्रेत्यांसह तिबेटियन नागरिकांनी दुकाने थाटल्याने ग्राहकांना स्वेटर, मफलर, जॅकेटचे अनेक प्रकार पाहावयास मिळत आहेत. सध्या स्वेटरचे दर कमी आहेत.

मात्र, थंडी वाढेल, तशी दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे स्वेटर विक्रेत्यांनी सांगितले. (Dhule Winter Update Bitter cold arrives in district with rain Sweater sellers set up shops in city)

शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे बोचरी थंडी जाणवू लागली आहे. थंडी जाणवू लागल्याने शहरात महापालिकेशेजारी तसेच देवपूरमध्ये तिबेटियन विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानांवर उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.

सध्या वेगवेगळ्या टी- शर्टची तरूणांमध्ये क्रेझ आहे. त्याच पद्धतीने स्वेटरदेखील बाजारात आले आहते.

ग्राहकांची पसंती

जुन्या पद्धतीच्या स्वेटरला पूर्णविराम देत टी-शर्टसारख्या स्वेटरला ग्राहक पसंती देत आहे. त्यात चेक्स, डक शेफ, लाईट असे प्रकार आहेत. तसेच महिलांसाठी शक लाँग लेडिज अंब्रेला टाइपचे स्वेटर यंदा पहिल्यांदाच बाजारात आले आहते.

त्यालाही महिलांकडून चांगली मागणी आहे. शॉल आणि मफलरमध्येही अनेक प्रकार दिसून येत आहेत. बहुतांशी स्वेटरला टोपीदेखील आहे. त्यामुळे वेगळी टोपी घेण्याची आवश्यकता नाही.

file photo
Nashik Winter Update: थंडीची चाहूल; उबदार कपड्यांना मागणी

जॅकेटलाही मागणी

स्वेटरमध्ये हाफ स्वेटर (अर्धबाही), पूर्ण स्वेटर, शर्टाच्या आत घालावयाचे स्वेटर, महिला व मुलींचेही स्वेटवर वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहेत. मफलर बांधण्याची प्रथा काहीअंशी बंद होऊन आता कानपट्ट्याला अधिक मागणी आहे.

स्वेटरऐवजी गरज जॅकेटला सर्वाधिक मागणी आहे. आठशे रुपयांपासून तीन हजारांपर्यत जॅकेटचा दर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

तिबेटियन विक्रेत्यांच्या सर्व दुकानांवर एकच भावात उबदार कपड्याची विक्री होत आहे. पाचशे रुपयांपासून दोन हजारांपर्यंत स्वेटर उपलब्ध आहेत. तथापि, महामार्गालगत परराज्यातील विक्रेत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जॅकेट विक्रीसाठी आणले आहेत.

हाफ जॅकेटला मागणी

उबदार कपड्यांमध्येही वेगवेगळया क्रेझ बाजारात दिसू लागल्या आहेत. त्याकडे तरुणाईचा विशेष कल दिसून येत आहे.

तरुणांसाठी टी-शर्टसारखे स्वेटर आणि अंब्रेला टाइपच्या स्वेटरला पसंती आहे, तर हाफ जॅकेटलाही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

file photo
Nashik Winter Update: पाऊस थांबला, गारठा वाढला..! कमाल तापमानात 5 अंशांची घसरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.