Women Raksha Bandhan Letter to CM: भाऊराया, नशामुक्त महाराष्ट्राची भेट दे! मुख्यमंत्री भावाकडे लाडक्या बहिणींचा पत्राद्वारे हट्ट

Dhule News : व्यसन हा तरुणाईला लागलेला असाध्य आजार आहे. याचा उपचार कुठे करता येईल, या विवंचनेत असलेल्या धुळे तालुक्यातील फागणे गावातील महिलांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री भावाला रक्षाबंधनाची भेट म्हणून नशामुक्त महाराष्ट्राची भेट द्यावी, असा हट्ट धरला आहे.
Letters sent by beloved sisters to the Chief Minister brother.
Letters sent by beloved sisters to the Chief Minister brother. esakal
Updated on

नवलनगर : फागणे (ता. धुळे) येथील जवळपास एक हजार १०० महिलांनी नशामुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांना भावनिक साथ घालत भावास पत्राद्वारे विनंती केली आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या व्यसनामुळे घरात महिलांना किती सोसावे लागते, भोगावे लागते, संसाराची राखरांगोळी होते.

किती वेदना होतात हे शब्दात मांडता येणारे दु:ख नाही. व्यसन हा तरुणाईला लागलेला असाध्य आजार आहे. याचा उपचार कुठे करता येईल, या विवंचनेत असलेल्या धुळे तालुक्यातील फागणे गावातील महिलांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री भावाला रक्षाबंधनाची भेट म्हणून नशामुक्त महाराष्ट्राची भेट द्यावी, असा हट्ट धरला आहे. (Women Raksha Bandhan Letter to CM eknath shinde)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.