Dhule ZP News : जिल्हा परिषद सीईओ नरवाडेंनी स्वीकारला पदभार

Dhule ZP : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे यांनी गुरुवारी (ता. २८) पदभार स्वीकारला.
CEO Vishal Narwade
CEO Vishal Narwadeesakal
Updated on

Dhule ZP News : येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे यांनी गुरुवारी (ता. २८) पदभार स्वीकारला. सीईओ श्री. नरवडे २०२० बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद, बुलडाणा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. (Dhule Zilla Parishad CEO Narwade assumes charge)

त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (कळवण, जि. नाशिक), सांगली जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. त्यापूर्वी श्री. नरवाडे यांनी दिल्ली येथे भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयात सहाय्यक सचिव म्हणून काम केले आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वी, त्यांनी २०१६ ते २०२० पर्यंत चार वर्षे भारतीय पोलिस सेवेत अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी काही प्रतिष्ठित व उत्कृष्ट कामे केली आहेत. नाशिक जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी कळवण या पदावर कार्यरत असताना श्री. नरवाडे यांना २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट निवडणूक नोंदणी अधिकारी पुरस्कार मिळाला आहे. (latest marathi news)

CEO Vishal Narwade
Dhule Crime News : मोबाईल चोरटे अर्ध्या तासात जेरबंद; देवपूर पोलिस, एलसीबीची कारवाई

त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा या पदाच्या कार्यकाळात जिल्हा परिषद शाळेला ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत अमरावती विभागातून सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. तसेच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत अमरावती विभागातून बुलडाणा येथील गावाने सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावला.

शैक्षणिक क्षेत्रात अनोखा ‘विशाल नरवाडे पॅटर्न’ महाराष्ट्र राज्यभर प्रसिद्ध आहे. वैयक्तिक जीवनात श्री. नरवाडे विदर्भातील एक हजार ६०० लोकसंख्येच्या एका छोट्या गावातले आहेत आणि तेथे राहतात. ते जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या आई अंगणवाडीसेविका होत्या, तर वडील पशुवैद्यकीय विभागाचे जिल्हा परिषद वर्ग-३ चे निवृत्त कर्मचारी आहेत.

CEO Vishal Narwade
Dhule Summer Heat : पुढील 3 दिवस उष्णता वाढीचा इशारा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.