Nandurbar News : टोलनाक्यासाठी सोडलेल्या जागेची दुरवस्था; वाहनांचे अपघात

Karjarai (Ta. Shahada) : A pit near the village on the land left for toll booths.
Karjarai (Ta. Shahada) : A pit near the village on the land left for toll booths.esakal
Updated on

Nandurbar News : तालुक्यातील विसरवाडी ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गावर लांबोळा ते करजई (ता. शहादा) गावाजवळ टोल नाक्यासाठी जागा सोडण्यात आली आहे.

त्या जागेवर मोठा खड्डा तयार होऊन पावसाळ्यात वाहनधारक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

अपघातांचे प्रमाण वाढल्याने परिसरातील गावातील ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता शहादा यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे.(Dilapidation of space left for toll naka vehicular accidents situation likely to worsen during rainy season Nandurbar News)

विसरवाडी ते सेंधवा हा राष्ट्रीय महामार्ग अनेक दिवसांपासून कार्यान्वित झाला आहे. या महामार्गावर करजई गावाजवळ साधारणत: अर्धा किलोमीटर अंतराची निर्धारित टोलनाक्यासाठी जागा सोडण्यात आली आहे.

जागा सोडून एक वर्षापेक्षा अधिक कालावधी होत आला आहे. परंतु संबंधित ठेकेदाराने या जागेवर पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. रस्त्यात खंड पडल्याने पर्यायाने मोठमोठे खड्डे तयार झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. भरधाव वेगाने रस्त्यावर येताना हे खड्डे वाहनधारकांना नजरेस पडत नाहीत. वाहन चालवताना कमालीची कसरत करावी लागते. एवढ्या जागेवर दुचाकी देखील काढणे कठीण जाते. शिवाय धूळ मोठ्या प्रमाणात उडत असल्याने रात्रीच्या वेळीच अपघाताचे प्रमाण अधिक आहे.

Karjarai (Ta. Shahada) : A pit near the village on the land left for toll booths.
Solapur News : बीआरएस मायभूमी, भाजप कर्मभूमी भाजपच्या माजी नगरसेवकांनी मांडली भूमिका

पावसाळा लागला आहे. ठेकेदाराने मात्र कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही. प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, शिवाय जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने दिली पण प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारे कृती केलेली नाही. पर्यायाने पावसाळ्यात या जागेवर तलाव साठण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्वरित उपाययोजना करण्यात आली नाही तर परिसरातील ग्रामस्थ शेतकरी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याच्या इशारा निवेदनात दिलेला आहे. याशिवाय पोलिस निरीक्षक शहादा पोलिस ठाण्याला निवेदन देण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Karjarai (Ta. Shahada) : A pit near the village on the land left for toll booths.
Nandu Joshi Case : PM, CM, महिला आयोगाकडे न्यायासाठी साकडं; पोलीस ठाण्यासमोर महिलेचा ठिय्या!

"विसरवाडी ते सेंधवा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर करजई गावाजवळ टोलनाक्यासाठी जागा सोडण्यात आली आहे. ती तशीच पडून आहे. ठेकेदारांनी दुर्लक्ष केले आहे. दोघे बाजूने काँक्रिटीकरण व मधेच मोठी फट निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे वाहने खड्ड्यात आदळतात. सातत्याने अपघात होत आहेत. पावसाळ्यात या जागेवर वाईट स्थिती होईल."

- हरी पाटील, प्रकाशा

Karjarai (Ta. Shahada) : A pit near the village on the land left for toll booths.
Nashik Monsoon Rain: इगतपुरी अन सुरगाणा तालुक्यामध्ये गेल्या 24 तासात पावसाची मेहेरबानी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.