Ashadhi Wari 2023 : हीच व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास ।।
पंढरीचा वारकरी। वारी चुको नेदी हरी।।
संतसंग सर्वकाळ। अखंड प्रेमाचा सुकाळ।।
चांद्रभागे स्नान। तुका मागे हेची दान।।
शिंदखेडा येथील बालाजी संस्थानची पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीला शंभराहून अधिक वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा मेघश्याम महाराज उपाख्य नाना महाराज यांनी टिकवून ठेवली आहे. (Dindi of Meghshyam Maharaj of Shindkheda welcome to kapdane dhule news)
या दिंडी पंढरपूरकडे विठू माऊली व हरिनामाचा गजर करीत निघाली आहे. दिंडीचे येथे मोठे स्वागत करण्यात आले. संपूर्ण गावातून दिंडीची मिरवणूक काढण्यात आली. येथील वारकरी सहभागी झाले.
बालाजी मठ या संस्थानाचे मठाधिपती मेघश्याम नारायण महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा येथून पंढरपूरला जाण्यासाठी दिंडी निघाली आहे. ही दिंडी तीस दिवसांचा पायी प्रवास करीत आषाढी एकादशीला पंढरपूरला पोचेल. अन विठू माऊलीचे दर्शन घेईल. शिंदखेड्याहून निघालेली दिंडी तिसऱ्या दिवशी येथे पोचली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
येथील वारकरी भगवान पाटील, छबीलाल पाटील, विनायक पाटील, दिनकर पाटील, नरेंद्र पाटील, श्री. सोनार, रवींद्र पाटील, विष्णू पाटील, बापू करनकाळ, विश्वास देसले, नरेंद्र पाटील, सुरेखा पाटील, विद्या पाटील, अंजनाबाई पाटील, मंगलबाई पाटील, जयवंताबाई बिऱ्हाडे, जिजाबराव पाटील आदींनी दिंडीचे स्वागत केले. दिंडीत अनेक भाविक सहभागी झाले.
दिंडी पाटोंदा, दरणे, वायपूर, सोनगीर, कापडणे, धुळे, विंचूर तरवाडे, चाळीसगाव, शिवापूर, कन्नड, बोरगाव, केसापुरी या मार्गाने पंढरपूरकडे जात आहे. दरम्यान मेघश्याम महाराज वृक्ष लावा, संवर्धन करा, पर्यावरणाचे रक्षण करा...हा संदेश देत पुढे जात आहेत.
विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन विठू माऊलीच्या पालखी सोहळ्याचा अनुभव निराळाच. आयुष्यात एकदा तरी पंढरीच्या वारीला जावे, अशी प्रत्येकाच्या मनी आस असते. अन ही वारी चुकू नये म्हणूनही विठुरायाला साकडे घातले जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.