धुळे : निजामपूर आणि जैताणे (ता. साक्री) येथे वीजचोरी आणि आकडे पकडण्याची धडक मोहीम महावितरणच्या धुळे ग्रामीण विभागीय कार्यालय व साक्री उपविभाग यांच्यामार्फत मंगळवारी (ता. १३) राबविण्यात आली.
मोहिमेत अधीक्षक अभियंता, धुळे मंडळ कार्यकारी अभियंता, ग्रामीण विभाग यांच्यासोबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता, चार उपकार्यकारी अभियंता, २२ अधिकारी आणि ११८ जनमित्र यांनी पोलिस बंदोबस्तात भाग घेतला. (Direct to Nizampur Jaitane 51 Action against power Thieves Dhule Crime News)
वीजचोरी पकडताना स्थानिक नागरिकांच्या विरोधाचा सामना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना करावा लागला. तथापि, पोलिस बंदोबस्तात मोहीम राबवून ५१ वीजचोरी प्रकरणे उघडकीस आणलेली आहेत.
या वीजचोरीच्या प्रकरणात दंडाची बिले देण्याचे काम प्रगतिपथावर असून, दंडाची वीजबिले न भरणाऱ्या ग्राहकांवर विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांनी कळविले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.