Dhule Municipal Corporation : पाणीटंचाईप्रश्‍नी कंपन्यांशी साटेलोटे; महापालिका आयुक्तांसह यंत्रणेवर गंभीर आरोप

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal
Updated on

Dhule News : शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यामागे मोठे षडयंत्र असून, महापालिकेतील आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांनी काही आरओ प्युरीफायर कंपन्यांशी साटेलोटे करत आर्थिक हित जोपासल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने पत्रकाद्वारे केला.

पक्षाचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, देविदास लोणारी, ललित माळी, भरत मोरे, नितीन शिरसाट, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे, डॉ. जयश्री महाजन आदींनी म्हटले आहे, की शहराला आवश्यकतेपेक्षा अधिकचा जलसाठा उपलब्ध आहे.

तरीही दहा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यास महापालिकेतील आयुक्तांसह अन्य संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. ढिसाळ नियोजनाबाबत होणारा आरोप हा केवळ दिखावा आहे. (Discuss water scarcity issues with companies Serious allegations against system including Municipal Commissioner Dhule News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Municipal Corporation
Dhule Accident News : अभियंता तरुणाला चारचाकी वाहनाने चिरडले

मोठे षडयंत्र

प्रत्यक्षात कृत्रिम पाणीटंचाईमागे मोठे षडयंत्र आहे. सहा महिन्यापूर्वी काही आरओ कंपन्यांनी राज्यात सर्वेक्षण केले. यात पाणीटंचाईच्या यादीत धुळे शहराचे नाव अग्रभागी आहे. कंपनीच्या प्रतिनिधीने देवपूरसह साक्री रोड, मिल परिसर, पेठ भाग, वलवाडी, महिंदळे परिसरात सर्वेक्षण केले. त्यासाठी आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी अन्य काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरत सर्वेक्षण भागातील रहिवाशांचा डाटा कंपनीच्या प्रतिनिधींना पुरविला.

परिणामी गेल्या तीन महिन्यात नऊ हजार घरांमध्ये, कार्यालयात आरओ सिस्टीम कार्यान्वीत झाली. एका आरओ सिस्टीमला १२ हजार या प्रमाणे कोट्यवधी रूपये काही कंपन्यांना मिळाले. त्यातून महापालिका प्रशासनातील प्रमुखांसह अन्य अधिकाऱ्यांना आर्थिक हित जोपासले.

असाच प्रकार जिओ ऑप्टीकल फायबर संदर्भात झाला असून शहरात पोल टाकताना सत्ताधारी भाजपच्या महापौरांसह नगरसेवकांना उल्लू बनवून कंपनीच्या फायद्याचे आदेश काढण्यात आले, असेही शिवसेनेने पत्रकात नमूद केले आहे.

Dhule Municipal Corporation
Dhule News : बाजारापेक्षा किरकोळ विक्रीत भाव खातेय भुईमूग शेंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.