Kaal Sarp Yog : कालसर्प योग आहे अशास्त्रीय? ज्योतिष पंडित ओझा यांनी सादर केला शोधप्रबंध

Laxman Mali, Principal Sanjay Sharma, Bharat Mali, Amol Deshpande, Sanjay Mali etc felicitating Pandit Narendra Ojha (second from left) at the Yashkirti ceremony at Vrindavanwadi.
Laxman Mali, Principal Sanjay Sharma, Bharat Mali, Amol Deshpande, Sanjay Mali etc felicitating Pandit Narendra Ojha (second from left) at the Yashkirti ceremony at Vrindavanwadi. esakal
Updated on

Kaal Sarp Yog : कालसर्पासारखा कोणताही योग किंवा दोष अस्तित्वात नाही. कालसर्प योगाला शास्त्रीय आधार नसून तो अशास्त्रीय आहे.

असा योग कुंडलीत असणारे जातक जीवनात यशस्वी होऊन उच्च पदावर विराजमान झाल्याची माहिती तळोदा येथील प्रख्यात ज्योतिष पंडित नरेंद्र ओझा यांनी दिली. (Dissertation about kaal sarp yog submitted by Jyotish Pandit Ojha nandurbar news)

तळोदा येथील वृंदावनवाडीत त्यांनी ज्योतिष पंडित ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. यानिमित्त त्यांच्या सन्मानार्थ विशेष उच्च पदवी यशकीर्ती सोहळा व व्याख्यान कार्यक्रम नुकताच झाला. त्या वेळी ते ‘कालसर्प योग’ या विषयावर बोलत होते. प्राचार्य प्रा. डॉ. संजय शर्मा अध्यक्षस्थानी होते.

कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरत माळी, पी. ई. सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण माळी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी नगरसेवक संजय माळी, समस्त ब्राह्मण समाज, तळोदाचे अध्यक्ष अमोल देशपांडे, विसालाड वाणी समाज, तळोदाचे अध्यक्ष देवेंद्र वाणी, समस्त श्रीमाळी समाज, तळोदाचे अध्यक्ष परिमल चौकशी आदी उपस्थित होते.

नरेंद्र ओझा यांनी पुणेस्थित फलज्योतिष संशोधन ज्ञानपीठ येथे ‘कालसर्प योग’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला व त्याला मान्यता मिळून मार्च २०२३ मध्ये त्यांना ज्योतिष पंडित ही उच्च पदवी विशेष प्रावीण्यासह बहाल केली. त्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंडित विजय जकातदार यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे ही पदवी त्यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी मिळविली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Laxman Mali, Principal Sanjay Sharma, Bharat Mali, Amol Deshpande, Sanjay Mali etc felicitating Pandit Narendra Ojha (second from left) at the Yashkirti ceremony at Vrindavanwadi.
Kalsarpa Dosh : घरात कापुर जाळा आपोआप वास्तू, कालसर्प दोष दूर होईल

श्री. ओझा मूळचे नंदुरबार येथील असून, ते तळोदा शहरातील मुरलीधर मंदिरात वीस वर्षांपासून सेवारत आहेत. ज्योतिष व कर्मकांडाचे कार्यही करतात. यासाठी त्यांनी ज्योतिषशास्त्रातील ज्योतिष प्रवीण (२००८), जोतिष प्राज्ञ (२००९), ज्योतिष विशारद-विवाह विलंब (२०१४) या पदव्या पुणेस्थित फलज्योतिष अभ्यास मंडळ संस्थेकडून प्राप्त केल्या आहेत.

दिनेश मराठे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला प्रसाद बैकर, मनीष सुगंधी, ॲड. सुधीर वाणी, रोहित कापडिया आदी उपस्थित होते.

मोठ्या हस्तींचा समावेश

पंडित नरेंद्र ओझा यांनी ‘कालसर्प योग’ या आपल्या शोधप्रबंधात विविध क्षेत्रांतील सुमारे पंचाहत्तर कालसर्प योग असणाऱ्या कुंडल्या व त्यांच्या जातकांचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. कालसर्प योग अशास्त्रीय आहे हे सिद्ध केले.

या जातकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिन तेंडुलकर, कपिल देव, रिकी पॉन्टिंग, संत तुलसीदास, कवी गुलजार, हर्षद मेहता, धीरूभाई अंबानी, दिलीप कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, नेपोलियन बोनापार्ट आदींचा समावेश आहे.

Laxman Mali, Principal Sanjay Sharma, Bharat Mali, Amol Deshpande, Sanjay Mali etc felicitating Pandit Narendra Ojha (second from left) at the Yashkirti ceremony at Vrindavanwadi.
Kaal Sarp Dosh : तुमच्याही कुंडलीत आहे काल सर्प दोष? जाणून घ्या दूर करण्याचा सोपा उपाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.