Dhule News : कृत्रिम अवयव प्राप्त झाल्यानंतर एक नवा जन्म मिळाल्याची भावना दिव्यांगांच्या मनात निर्माण होते. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलते. दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील हे हास्यच आमच्यासाठी मोठा आनंद व समाधान देणारे आहे, अशा भावना मान्यवरांनी दिव्यांगांना कृत्रिम वाटप अवयव वाटप कार्यक्रमात व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात २७० दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले. (Distribution of prosthetic limbs to disabled peoples dhule news)
अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळ, धुळे यांच्यातर्फे नारायण लिम्ब व कॅलिपर्स फिटमेंट शिबिर गुरुवारी (ता. १८) येथील अग्रवाल विश्राम भवन येथे झाले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उद्योजक महेश मित्तल (नाशिक), ताराचंद गुप्ता, विनोद मित्तल, अनुप ओमप्रकाश अग्रवाल, अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल.
सचिव दिनेश गिंदोडिया, खजिनदार पीयूष अग्रवाल, व्यवस्थापक विक्रम केडिया, नारायण सेवा संस्थानचे हरिप्रसाद लढ्ढा, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष जगदीश गिंदोडिया, श्रीमती भारती आदी उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमाला ओमप्रकाश अग्रवाल म्हणाले, की अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप कार्यक्रम हा अत्यंत चांगला उपक्रम मंडळातर्फे घेण्यात येत आहे.
दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटपातून त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य उमलते ते आमच्यासाठी समाधान देणारे व उपक्रम राबविल्याचे सार्थक झाल्याचे दिसते. कृत्रिम अवयव मिळाल्याने दिव्यांगांना नवा जन्म मिळाल्याचा आनंद मिळतो.
महेश मित्तल म्हणाले, की संस्थेतर्फे अत्यंत चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम आम्हीदेखील घेतो, मात्र एवढ्या मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम आनंद देणारा आहे. अग्रवाल समाज असे समाजोपयोगी कार्यक्रम घेत असल्याचाही आनंद आहे.
हरिप्रसाद लढ्ढा यांनी नारायण संस्थानच्या कार्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, की संस्थानतर्फे गेल्या ३९ वर्षांत दिव्यांगांसाठी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आतापर्यंत चार लाखांवर दिव्यांगांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
ज्या दिव्यांगांना कृत्रिम अवयवाची, शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांनी थेट उदयपूरला जरी आले तरी त्यांचे स्वागत आहे. संस्थानतर्फे त्यांना संपूर्ण सहकार्य व मदत केली जाईल. नारायण सेवा संस्थान दिव्यांगांसाठी समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थानचे संस्थापक अध्यक्ष कैलाश मानव यांच्या कार्याविषयीदेखील त्यांनी माहिती दिली. आजच्या कार्यक्रमात २७० दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले, तसेच निवड झालेल्या १७ दिव्यांगांवर शस्त्रक्रिया करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजेश गिंदोडिया यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.