Nandurbar News : पशुधनाच्या वंध्यत्वाची तपासणी करून घ्यावी; जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे आवाहन

District Animal Husbandry Deputy Commissioner Appeal of Livestock should be checked for Infertility nandurbar news
District Animal Husbandry Deputy Commissioner Appeal of Livestock should be checked for Infertility nandurbar newsesakal
Updated on

Nandurbar News : राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियानांतर्गत पशुपालकांनी आपल्या भाकड पशुधनांची वंध्यत्व तपासणी करून योग्य औषधोपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उ. दे. पाटील यांनी केले. ( District Animal Husbandry Deputy Commissioner Appeal of Livestock should be checked for Infertility nandurbar news )

शेतकरी, पशुपालक त्यांच्याकडील गायी-म्हशींमध्ये असलेल्या, उद्‌भवलेल्या वंध्यत्वाचे निवारण करण्यासाठी १९ डिसेंबर २०२३ पर्यंत राज्यामध्ये राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाने व पशुचिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये किमान एका वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

पशुपालकांनी त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक भाकड, दुधाळ जनावराची अभियानात तपासणी करून आवश्यक औषधोपचार करून घ्यावेत.

District Animal Husbandry Deputy Commissioner Appeal of Livestock should be checked for Infertility nandurbar news
Nandurbar News : आदिवासी, सर्वसाधारण क्षेत्राचा समतोल विकास साधणार : डॉ. विजयकुमार गावित

अभियानाबाबत अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद अथवा उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

District Animal Husbandry Deputy Commissioner Appeal of Livestock should be checked for Infertility nandurbar news
Nandurbar News : रेल्वेच्या खांबावर चढून एकाचा ठिय्या; मनोरुग्ण असल्याचा प्रशासनाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.