Meri Mati Mera Desh initiative : जिल्ह्यात शिलास्मारक उभारणार : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

District Collector Abhinav Goyal statement about  Meri Mati Mera Desh initiative dhule news
District Collector Abhinav Goyal statement about Meri Mati Mera Desh initiative dhule newsesakal
Updated on

Meri Mati Mera Desh initiative : देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ९ ते २० ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती, पालिका व महापालिकेत एक शिलास्मारक उभारण्यात येईल.

त्यावर गावातील स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मा, शहिदांची नावे असतील. तसेच प्रत्येक गावातील माती संकलित करून ती जिल्हाभरातील पाच युवक कलशातून दिल्लीला नेतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. (District Collector Abhinav Goyal statement about Meri Mati Mera Desh initiative dhule news)

देशात ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारकडून ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम राबविला जाईल. याबाबत श्री. गोयल यांनी सोमवारी (ता. ७) पत्रकार परिषदेत माहिती दिली. उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी महेश जमदाळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात विविध उपक्रम

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गेल्या वर्षी ‘घर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात आला. यंदाही स्वातंत्र्यदिनी नागरिकांना घरांवर तिरंगा ध्वज लावता येईल. त्यासाठी ध्वजही उपलब्ध करून दिले जातील. नागरिकांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनी आपल्या घरांवर ध्वज लावावेत.

तसेच ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यंदा ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम राबविला जाईल. त्यात प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात शिलास्मारक उभारले जातील. त्यावर स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मा व शहीद जवानांच्या नावांचा उल्लेख असेल. या ठिकाणी ७५ झाडांची अमृत वृक्षवाटिकाही तयार केली जाईल. त्याबाबत सर्व ग्रामपंचायतींना सूचित केले आहे. त्यानुसार त्यांच्याकडून तयारी केली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

District Collector Abhinav Goyal statement about  Meri Mati Mera Desh initiative dhule news
Dhule News: दोंडाईचात 13 हजार घरांना मोफत नळ कनेक्शन! आमदार रावल यांच्या हस्ते वितरण

चारशे शिलांची नोंद

ग्रामपंचायतस्तरावर ९ ते १५ आणि शहरी भागात १५ ते २० ऑगस्टदरम्यान वृक्षवाटिका अभियान राबविले जाईल. याकामी रोपेही उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच जिल्ह्यासाठी ४०० शिलांची नोंदणी झाली आहे. त्याबाबतची रचना केंद्राने निश्चित केली आहे. या उपक्रमात प्रत्येक गावातून कलशात माती संकलित करण्यात येईल.

तालुकापातळीवर ती पंचायत समितीत एकत्र केली जाईल. तेथून जिल्हास्तरावर माती संकलित होईल. प्रत्येक तालुक्यातून एक युवक, असे पाच युवक जिल्हाभरातून संकलित झालेली माती दिल्ली येथे घेऊन जातील. जिल्हाभरातून ही माती जेव्हा जाईल तेव्हा मेरी माटी, मेरा देश यात्राही काढण्यात येईल, असे जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले.

District Collector Abhinav Goyal statement about  Meri Mati Mera Desh initiative dhule news
Dhule News: 128 कोटी उत्पन्नात ‘थकबाकी’च भारी! मालमत्ता कर, पाणीपट्टीतून मिळणारे अपेक्षित उत्पन्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.