Diwali 2023 : दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाताय... शेजाऱ्यांना माहिती द्या; जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे आवाहन

thief
thiefesakal
Updated on

Diwali 2023 : दिवाळीनिमित्त सध्या मुलांच्या शाळांना सुट्या लागल्या असून, बरेच नागरिक त्यांच्या मूळ गावाकडे, पर्यटनस्थळी फिरायला जाण्यासाठी किंवा नातेवाइकांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी जातात.

त्यामुळे रेल्वे व बसस्थानक इत्यादी ठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. ( District Superintendent of Police Appeal to inform neighbors on Going out Diwali vacation nandurbar news)

रेल्वेमध्ये किंवा बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल, पाकीट व इतर मौल्यवान दागिने चोरीला जाण्याची शक्यता जास्त असते. बाहेरगावी किंवा पर्यटनस्थळी फिरायला जाताना, नागरिकांनी सतर्क राहून सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

मौल्यवान दागिने परिधान करू नका

अनेक दिवस घरे बंद असतात. अशा वेळी चोरट्यांच्या टोळ्या दिवसा बंद घरांची पाहणी करून रात्री किंवा दिवसा चोरी करतात. यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, नागरिकांनी बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना व स्थानिक पोलिसांना अवगत करावे जेणेकरून त्या परिसरात पोलिसांच्या गस्तीदरम्यान अशा बंद घरांवर लक्ष ठेवता येईल.

नागरिकांनी बाहेरगावी जाताना घरात मौल्यवान दागिने, किमती ऐवज, रोख पैसे घरात ठेवण्याऐवजी बँकेतील लॉकरमध्ये ठेवावेत. बाहेरगावी जाताना प्रवासादरम्यानदेखील काही अनोळखी व्यक्ती प्रवाशांना बोलण्यात गुंतवून सामानाची किंवा इतर मौल्यवान दागिन्यांची चोरी करतात.

त्याचप्रमाणे प्रवास करताना काही महिला दागिने परिधान करून घराबाहेर पडत असतात. अशा वेळी सोनसाखळी चोरीच्या घटना घडतात. त्यामुळे प्रवास करताना महिलांनी शक्य असल्यास मौल्यवान दागिने परिधान करण्याचे टाळावे.

thief
Diwali 2023 : भारतातल्या या गावात दिवाळी दिवशी व्यक्त केला जातो शोक, पण का?

बाहेरगावी जातानाचे स्टेटस ठेवू नका

बाहेरगावी जाताना बरेच नागरिक समाज माध्यमांवर त्यांचे बाहेरगावी जातानाचे स्टेटस ठेवत असतात. अनेक सराईत गुन्हेगार समाज माध्यमांवर क्रियाशील असतात आणि याच संधीचा फायदा घेऊनदेखील बंद घरांमध्ये चोरी होण्याच्या घटना होत असतात.

त्यामुळे समाज माध्यमांवर बाहेरगावी जात असतानाचे स्टेटस ठेवण्याचे नागरिकांनी टाळावे. कारण अशा प्रकारच्या बऱ्याच घटना घडलेल्या आहेत.

बाजारात जाताना काळजी घ्या

बाजारात खरेदीसाठी जाताना नागरिकांनी त्यांचे मोबाईल, पाकीट इत्यादी वस्तू शर्टाच्या वरच्या खिशात ठेवू नयेत, तसेच बाजारात खरेदीसाठी जाताना काही महिला सोन्याचे मौल्यवान दागिने परिधान करून बाहेर पडत असतात. त्यामुळे सोनसाखळी चोरीच्या घटना होतात.

त्यामुळे नागरिकांनी मोबाईल, पाकीट इत्यादी वस्तू शर्टाच्या वरच्या खिशात न ठेवता पॅन्टच्या खिशात ठेवाव्यात. तसेच महिलांनीदेखील बाजारात खरेदीसाठी जाताना सोन्याचे मौल्यवान दागिने परिधान करण्याचे शक्य असल्यास टाळावे.

thief
Diwali 2023: दिवाळीच्या तोंडावर सुका मेव्याने खाल्ला भाव; नागरिकांच्या खिशाला कात्री

दुचाकीला सेन्सरचे लॉक बसवा

बाहेरगावी जाताना मोटारसायकल सुरक्षिततेच्या दृष्टीने फक्त हँडल लॉकवर अवलंबून न राहता किंवा वाहन घराच्या कंपाउंडच्या आत लोखंडी साखळी कुलपासह लावावीत. रात्रीच्या वेळेस आपली मोटारसायकल लॉक केल्यानंतर वाहनास कुठल्याही प्रकारचा स्पर्श झाल्यास किंवा हात लावल्यास सेन्सरद्वारे मोठ्याने आवाज होईल असे लॉक बाजारात अथवा ऑनलाइन सहज उपलब्ध होतात, म्हणून जास्तीत जास्त नागरीरिकांनी या लॉकचा वापर करावा करावा, जेणेकरून आपली मोटारसायकल सुरक्षित राहील.

ही काळजी घ्या

-बाहेरगावी जाण्यापूर्वी नागरिकांनी घरातील मौल्यवान वस्तू, दागिने, रोख रक्कम घरात न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावी.

-घरात आवाज येण्यासाठी अलार्म सिस्टिम कार्यान्वित करावी. घराला सेफ्टी ग्रिल दरवाजा बसवावा.

thief
Diwali 2023: इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ तेजीत! भरघोस डिस्काउंट अन् सहज कर्जाच्या सोयीने ग्राहकांमध्ये उत्साह

-कॉलनी, वसाहत परिसरात विश्वासू सुरक्षारक्षक नेमावा. अलीकडे चोरट्यांच्या टोळ्या चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरा बंद करणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर बंद करणे किंवा डीव्हीआर चोरून नेणे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या दिसून आलेल्या आहेत.

-नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर सुरक्षित ठिकाणी बसवावा.

-कॉलनी, वसाहत परिसरात अनोळखी व्यक्ती किंवा कोणीही संशयास्पद परिस्थितीत फिरत असताना आढळल्यास तत्काळ डायल-११२ किंवा जवळच्या पोलिस ठाण्याला संपर्क करावा.

''बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी शेजाऱ्यांना व स्थानिक पोलिसांना अवगत करावे.''-पी. आर. पाटील, पोलिस अधीक्षक, नंदुरबार.

thief
Diwali 2023 : धुळ्यातील बाजारपेठ गर्दीने फुलली; रेडीमेड फराळाकडे अधिक कल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()