Dhule Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस यंत्रणा सतर्क आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व निर्विघ्न वातावरणात पार पाडण्याकामी जिल्हा पोलिस दल सज्ज आहे. या अनुषंगाने केंद्रनिहाय पोलिस बंदोबस्ताचे नियोजन झाले आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचारी, होमगार्डसह साडेसात हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त असेल. याशिवाय केंद्रीय व राज्य राखीव दलाच्या पाच तुकड्या तैनात असतील. ( Shrikant Dhivare statement of 7,500 police personnel deployed )
तसेच अनुसूचित प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर कारवाई केली जात आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. लोकसभेच्या धुळे मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण व शिंदखेडा असे तीन विधानसभा मतदारसंघ, तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील साक्री व शिरपूर असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात एकूण एक हजार ७०४ मतदान केंद्रे आहेत.
त्यांपैकी हजार एक मतदान केंद्र धुळे लोकसभा मतदारसंघात, तर उर्वरित ७०३ मतदान केंद्रे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आहेत. धुळे जिल्ह्यातील एकूण ८५० इमारतींमध्ये एक हजार ७०४ मतदान केंद्रे आहेत. याकामी बंदोबस्त पुरविण्यात येईल. जिल्ह्यातील बूथवर एक जहार ४३६ पोलिस अंमलदार व एक हजार २४७ होमगार्ड तैनात असतील.
आंतरराज्य नाक्यांवर नियुक्ती
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात ८६ पोलिस अंमलदार व ८६ होमगार्ड, सेक्टर मॅजिस्ट्रेट पेट्रोलिंगसाठी १६३ पोलिस अंमलदार, सेक्टर पोलिस, १६३ पोलिस अंमलदार नियुक्त असतील. जिल्ह्यात दहा आंतरजिल्हा तपासणी नाके आहेत. तिथे ४० पोलिस अंमलदारांची नेमणूक झाली आहे. २१ आंतरराज्य तपासणी नाक्यांवर नऊ पोलिस उपनिरीक्षक व ८४ पोलिस अंमलदार नियुक्त आहेत. जिल्ह्यात १५ स्थिर सर्वेक्षण पथकांची नियुक्ती आहे. त्यात एकूण ९० पोलिस अंमलदार, १७ फ्लाइंग स्क्वॉडमध्ये १०२ पोलिस अंमलदार, ईव्हीएमसाठी नऊ पथके कार्यान्वित आहेत. (latest marathi news)
पोलिसपाटलांसोबत बैठका
धुळे जिल्ह्यानजीकचे जिल्हे नंदुरबार, जळगाव व नाशिक येथील पोलिस अधिकाऱ्यांसमवेत वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. आंतरराज्य सीमेवरील पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्येक आठवड्याला दोन बैठका घेण्यात येऊन योग्य तो समन्वय राखला जातो आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेजारील राज्य गुजरात व मध्य प्रदेश सीमा बैठकांवर भर दिला जात आहे. केंद्रीय राखीव दलाच्या पथकांकडून रूट मार्च आणि एरिया डोमिनेशन करण्यात येत आहे.
निवडणूक नि:पक्ष व निर्भय वातावरणात पार पाडण्यासंबंधी गावातील पोलिसपाटलांसोबत बैठका घेतल्या जात आहेत. तसेच कॉर्नर बैठका, मोहल्ला समिती, शांतता समितीच्या नियमित बैठका घेतल्या जात आहेत. पोलिस सेक्टर अधिकारी, नियुक्त पोलिस अधिकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी नियमित भेट देत आहेत.
असा पोलिस बंदोबस्त तैनात
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोर्समध्ये तीन पोलिस उपनिरीक्षक व २१ पोलिस अंमलदार, तीन आरसीपी पथकांमध्ये ७५ पोलिस अंमलदार, पोलिस ठाण्यांची १०६ पेट्रोलिंग पथके आहेत. त्यात १०६ पोलिस उपनिरीक्षक व २९० पोलिस अंमलदार तसेच तीन सीएपीएफ व दोन एसएपी कंपन्यांमध्ये प्रत्येकी ९० प्रमाणे ४५० जवान तैनात असतील.
१७ प्रभारी अधिकारी मोबाईल पेट्रोलिंगसाठी नऊ पोलिस निरीक्षक, सात सहाय्यक पोलिस निरीक्षक व सोबत पोलिस अंमलदार असा एकूण चार हजार ७४२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त देण्यात आला आहे.
याखेरीज जिल्ह्यात एक पोलिस अधीक्षक, एक अपर पोलिस अधीक्षक, तीन उपविभागीय पोलिस अधिकारी, १३ पोलिस निरीक्षक, आठ सहाय्यक पोलिस निरीक्षक, १३२ पोलिस उपनिरीक्षक, एक हजार ३४५ पोलिस अंमलदार, एक हजार ३३३ होमगार्ड आणि सीएपीएफ व एसएपीच्या पाच तुकड्या असा बंदोबस्त तैनात असेल.
तज्ज्ञांकडून पोलिसांना प्रशिक्षण
जिल्ह्यात केंद्रीय व राज्य राखीव दलामार्फत ५७ ठिकाणी एरिया डॉमिनेशन करण्यात आले आहे. तसेच मतदानाच्या दिवशी एकूण ५० ठिकाणी केंद्रीय व राज्य राखीव दलाच्या जवानांचे सेक्शन तैनात केले जाईल. ताररहित संपर्क (वायरलेस कम्युनिकेशन) सुरळीत होण्यासाठी कुडाशी व पळासनेर या दोन ठिकाणी संप्रेषण पुनरावर्तक (कम्युनिकेशन रिपीटर) बसविण्यात आहेत.
निवडणुकीसाठी दोन हजार १३ लहान-मोठ्या वाहनांचा ताफा सज्ज आहे. त्यात कार, जीप, मध्यम व्हॅन, बस, लाइट व्हॅन, ट्रक आदींचा समावेश आहे. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस दलातील एकूण ११७ पोलिस अधिकारी व एक हजार ७०३ पोलिस अंमलदारांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
''लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस दल सज्ज आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी दिल्या आहेत. जिल्ह्यात पोलिसांद्वारे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे लोकसभेसाठीचे मतदान शांततेत व निर्भय वातावरणात पार पडेल, अशी पोलिस यंत्रणेतर्फे व्यवस्था करण्यात आली आहे.''-श्रीकांत धिवरे, जिल्हा पोलिस अधीक्षक, धुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.