Nandurbar News : दिवाळी फराळवाटप; सामाजिक भानामुळे गोरगरिबांची दिवाळी गोड

While distributing Diwali snacks, Police Inspector Rahul Kumar Pawar, Sub-Inspector Mahesh Nikam, And. Alpesh Jain etc.
While distributing Diwali snacks, Police Inspector Rahul Kumar Pawar, Sub-Inspector Mahesh Nikam, And. Alpesh Jain etc.esakal
Updated on

Nandurbar News : तळोद्यातील सेवाभावी सामाजिक संस्था सहयोग सोशल ग्रुपतर्फे शहरातील गोरगरिबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी त्यांच्या वस्तीवर जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करण्याचा उपक्रम राबविला आहे. या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

दिवाळीचा सण सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत असला, तरी गोरगरीब कुटुंब या सणाच्या आनंदाला परिस्थितीअभावी पारखे होतात. (Diwali Snacks for poor due to social consciousness nandurbar news)

हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे व वाढत्या महागाईमुळे संसाराचा गाडा ओढून नेणे हे त्यांच्या आवाक्या बाहेरचे असते. त्यामुळे त्यांची कसली दिवाळी? दिवाळीच्या आनंदाला हे गरीब लोक पारके होतात. अशा गरीब कुटुंबातील लहान मुले-मुली दिवाळीचा आनंद प्रत्यक्षात घेऊ शकत नाहीत. समाजातातील हे वास्तव आपण नेहमीच पाहत असतो.

दिवाळीच्या आनंदाला बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पारखे झालेल्या अशा गोरगरीब कुटुंबाच्या वस्तीवर जाऊन अशी गरीब कुटुंबे व त्यांच्या मुला-बाळांना दिवाळीच्या फराळाचे पॅकेट वाटप करून त्यांची दिवाळी गोड व आनंदी करण्याच्या एक आदर्श उपक्रम शहरातील सेवाभावी सामाजिक संघटना सहयोग सोशल ग्रुप सहा वर्षांपासून दर वर्षी राबवीत आहे.

या वर्षीदेखील सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड. अल्पेश जैन व त्यांच्या सहकाऱ्यांतर्फे हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.

पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलिस उपनिरीक्षक महेश निकम, पोलिस उपनिरीक्षक सागर गाडीलोहार, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रमेश मगरे, संघटक रमेशकुमार भाट, पोलिसपाटील संघटनेचे अध्यक्ष अशोक पाडवी तसेच इतर पोलिसपाटील, पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

While distributing Diwali snacks, Police Inspector Rahul Kumar Pawar, Sub-Inspector Mahesh Nikam, And. Alpesh Jain etc.
Nandurbar News : नागाई साखर कारखान्याचे मेन्टेनन्स कामकाज बंद; शेतकऱ्यांकडून बेमुदत धरणे आंदोलन

उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सहयोग सोशल ग्रुपच्या माध्यमातून या सेवाभावी उपक्रम राबविणाऱ्यांना ॲड. अल्पेश जैन यांचे कौतुक केले. या कार्यक्रमात कुशल जैन, चेतन शर्मा, मोईन पिंजारी, प्रमोद जहाँगीर, नितीन पाटील, प्रेम पाडवी, काळूसिंग पाडवी दीपक पाडवी, किसन भरवाड, चेतन धनका, अक्षय धानका, हरेश भरवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

''दिवाळीच्या आनंदायी पर्वावर गोरगरीब कुटुंबात दिवाळीच्या फराळवाटप करण्याचे सामाजिक कार्य गेल्या सहा वर्षांपासून सहयोग सोशल ग्रुपच्या माध्यमातून सुरू आहे. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून, समाजाला या उपक्रमातून प्रेरणा मिळेल.''-राहुलकुमार पवार, पोलिस निरीक्षक, तळोदा

''गोरगरिबांना दिवाळीचा फराळवाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी अनेक वर्षांपासून राबवीत असून, त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.''-प्रा. रमेश मगरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र ग्राहक पंचायत

While distributing Diwali snacks, Police Inspector Rahul Kumar Pawar, Sub-Inspector Mahesh Nikam, And. Alpesh Jain etc.
Nandurbar Crime News : कुख्यात गुन्हेगार वर्षभरासाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.