Medical Education : जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणात अमर्याद संधी!

Career opportunities from medical education
Career opportunities from medical educationesakal
Updated on

नंदुरबार : जेवढा दुर्गम भाग असेल तेवढ्या आरोग्याच्या समस्या जटिल असतात; अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेताना जे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल ते जगाच्या पाठीवर कुठेही मिळू शकत नाही त्यामुळे नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या अमर्याद (Limitless) संधी आहेत. (doctor gavit statement about opportunities in medical education in district nandurbar news)

तसेच जिल्ह्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षात विविध विभागांच्या निर्माण होणाऱ्या स्वतंत्र इमारतींमुळे प्रशासकीय कामगाज गतिमान व अधिक सुविधांनीयुक्त होईल, असा विश्वास गुरुवारी (ता. ९) आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.

नंदुरबार शहरात माता व बालसंगोपन रुग्णालय, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र समिती, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतींच्या पायाभरणी समारंभप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. गिरीश

ठाकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी तसेच जातपडताळणी समितीचे सहआयुक्त गिरीश सरोदे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त विभागीय गणेश परळीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध यंत्रणांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Career opportunities from medical education
Scholarship Exam : राज्यातील 9 लाख विद्यार्थ्यांची रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा

या वेळी बोलताना डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, की जिल्ह्याची निर्मिती अत्यंत आग्रहपूर्वक व दूरदृष्टिकोनातून करण्यात आली आहे. पालकमंत्री या नात्याने विविध उपक्रम, योजना, संसाधनांची निर्मिती करून जिल्ह्याच्या पालनपोषणाच्या जबाबदारीचे निर्वहन अत्यंत सूक्ष्म नियोजन व दृष्टिकोनातून केले जाईल.

गुजरात, मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या या भागाचा विकास केवळ स्वतंत्र जिल्हानिर्मितीमुळे आपण करू शकलो. नंदुरबार जिल्ह्यासोबत व त्यानंतरही ज्या जिल्ह्यांची निर्मिती झाली त्या जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबारचा विकास अत्यंत वेगाने व शाश्वत स्वरूपात आपण करतो आहोत.

लवकरच वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेतलेली पहिली बॅच बाहेर येणार असून, या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी नक्कीच स्वत:ला भाग्यशाली समजतील एवढ्या क्लिष्ट स्वरूपाची रुग्णसेवा त्यांच्या हातून शिक्षण घेतानाच होते आहे. त्यामुळे जगातील कुठल्याही आरोग्य समस्येला सहज उपाय करणारे विद्यार्थी येथे घडलेले आपल्याला दिसतील.

Career opportunities from medical education
Nashik Fraud Crime : बनावट मुखत्यारपत्र बनवून फ्लॅटवर घेतले 6 कोटींचे कर्ज; फसवणुकीचा गुन्हा दाखल

लवकरच वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींचा पायाभरणी समारंभ होणार असून, ४१ एकरच्या परिसरात सुसज्ज, सर्व सुविधांनीयुक्त असे वैद्यकीय शिक्षण संकुल आपल्याला पाहावयास मिळणार आहे. त्याचबरोबर

लवकरच येथे वैद्यकीय शिक्षणाचे पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. गावित यांनी देऊन विविध इमारतींच्या पायाभरणीस शुभेच्छाही दिल्या.

जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे पोषण करणार ः डॉ. सुप्रिया गावित

जिल्ह्यातील कुठलेही बालक पोषणापासून वंचित राहणार नाही याची काळजी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेतली जात आहे. कामाच्या निमित्ताने परराज्यात स्थालांतरित होणाऱ्या मजुराच्या मुलांना ट्रॅक करून ते ज्या राज्यातील गावात स्थलांतरित होत आहेत तेथे अंगणवाडी व प्रशासनाच्या समन्वयातून पोषण आहार दिला जात आहे.

Career opportunities from medical education
Rickshaw Beauty Competition : सौंदर्य स्पर्धेत प्रभाळे यांची रिक्षा प्रथम

जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे पोषण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वचनबद्ध असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितले.

कुपोषणमुक्त जिल्ह्याची ओळख निर्माण करणार ः डॉ. हीना गावित

कुपोषण आणि बालमृत्यूचा शिक्का आपल्या जिल्ह्याला बसला असून, हा शिक्का पुसून काढण्याची पायाभरणी म्हणजे हे माता व बालसंगोपन रुग्णालय असून, जिल्ह्यातील प्रत्येक माता व जन्माला येणारे बालक सुदृढ व निरोगी राहील यासाठी देशातील उपलब्ध सर्वोच्च साधनसामग्री व सुविधा या रुग्णालयात केल्या जाणार आहेत.

केंद्र सरकारच्या माध्यमातून या रुग्णालयाची निर्मिती केली जात असून, त्यासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन या वेळी खासदार डॉ. हीना गावित यांनी दिले.

Career opportunities from medical education
Nashik Crime News : सटाणा पोलिसांची अवैध व्यवसायिकांविरोधात धडक कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.