Ayushman Bharat Card : डॉक्टर, कर्मचारी, नागरिकांनो ‘आभा’ कार्ड बनवा! : महापालिका आरोग्य विभाग

Ayushman Bharat Card
Ayushman Bharat Cardesakal
Updated on

धुळे : आयुष्मान भारत डिजिटल मिशन योजनेंतर्गत शासकीय व खासगी आरोग्य संस्था, शासकीय सेवेतील नियमित व कंत्राटी डॉक्टर तसेच नागरिकांनी आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (एबीएचए) अर्थात ‘आभा’ कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील २६ खासगी रुग्णालयांनी त्यांच्या अधीनस्त कर्मचाऱ्यांचे ‘आभा’ कार्ड बनवून घेतले आहे. ( Doctors Employees Citizens Make Ayushman Bharat Card dhule Municipal Health Department dhule news)

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, दिल्ली यांच्यातर्फे आयुष्मान भारत डिजिटल मिशन ही योजना देशभर कार्यान्वित करण्यात आली आहे. हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, याद्वारे सर्व आरोग्य संस्था, वैद्यकीय व्यावसायिक, शहरातील नागरिक यांची नोंदणी एबीडीएम पोर्टलवरून करून देशातील आरोग्यसेवा वितरणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी, सर्व आरोग्यसेवा डिजिटल स्वरूपात पोचविण्याकरिता या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे.

यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशन या पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने राज्यातील सर्व नागरिकांचे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (एबीएचए) हेल्थ आयडी बनविणे गरजेचे आहे. डिजिटल हेल्थ आयडीकरिता https://healthid.ndhm.gov.in/register या लिंकवर जाऊन नोंदणी करता येईल.

यासाठी आपल्या आधारकार्डला मोबाईल नंबर संलग्न असणे बंधनकारक आहे. या लिंकद्वारे आपण स्वतः हेल्थ आयडी बनवू शकता तसेच आवश्‍यकता असल्यास हिरे मेडिकल कॉलेज येथील आरोग्यमित्र यांचीही सहाय्यता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Ayushman Bharat Card
Nashik ZP News : अनुकंपावरील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी; 118 उमेदवार प्रतीक्षेत

सव्वीस रुग्णालयांकडून कार्यवाही

धुळे महापालिकेंतर्गत १८९ खासगी रुग्णालये आहेत. त्यातील २६ रुग्णालयांकडून त्यांच्या अधीनस्त कर्मचाऱ्यांचे आभा कार्ड काढण्यात आले आहे. उर्वरित खासगी रुग्णालयांनीही आपल्या अधीनस्त कर्मचारी तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांचे हेल्थ आयडी बनवून घ्यावे, असेही आवाहन महापालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

‘आभा’चे फायदे

आभा कार्डमुळे आपले स्वतःचे एक स्वतंत्र आरोग्य अकाउंट तयार होईल, ज्याद्वारे आपले आरोग्यविषयक सर्व बाबी डिजिटल स्वरूपात साठवता येतील. ज्यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या, औषधे व उपचाराची माहिती डिजिटल स्वरूपात कायमस्वरूपी साठवून ठेवता येईल.

Ayushman Bharat Card
Clapping Therapy : टाळ्या वाजवा अन्‌ प्रतिकारशक्ती वाढवा!; आरोग्‍याला होतोय फायदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()