Dhule Market Committee Election : जयकुमार रावल यांच्या ‘जय किसान’ची विजयी सलामी

BJP sponsored Jai Kisan panel cheered after the two seats of the traders constituency went uncontested in the Agricultural Produce Market Committee elections.
BJP sponsored Jai Kisan panel cheered after the two seats of the traders constituency went uncontested in the Agricultural Produce Market Committee elections. esakal
Updated on

Dhule Market Committee Election : दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या एक दिवस आधीच महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आमदार जयकुमार रावल यांच्या जय किसान पॅनलच्या व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या. (Dondaicha market committee election Jai Kisan panel candidate was unopposed Hence winning start of MLA Rawal panel dhule news)

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागांसाठी पाच उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यात दोंडाईचाचे माजी नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे, शशांक भावसार व अरुण चौधरी यांनी आपले उमेदवारी अर्ज गुरुवारी (ता. २०) मागे घेतले. त्यामुळे भाजपपुरस्कृत रोशन रमेश टाटिया व राहुल कवाड यांचेच अर्ज राहिले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

BJP sponsored Jai Kisan panel cheered after the two seats of the traders constituency went uncontested in the Agricultural Produce Market Committee elections.
NMC Water Reduction : पाणी कपात नेमकी कोणासाठी? महापालिकेला आज सादर होणार अहवाल

हे दोन्ही जय किसान पॅनलचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे दोंडाईचा बाजार समितीत आमदार रावल यांच्या पॅनलची विजयी सुरवात झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सभापती नारायण पाटील, कामराज निकम, जिजाबराव सोनवणे, रमेश पारख, प्रवीण माळी यांच्यासह व्यापारी बांधवांनी या विजयाचा जल्लोष केला. व्यापारी बांधवांनी या दोन्ही जागा बिनविरोध करून आमदार रावल यांनी केलेल्या विकासावर विश्वास ठेवल्याची प्रतिक्रिया बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी दिली.

BJP sponsored Jai Kisan panel cheered after the two seats of the traders constituency went uncontested in the Agricultural Produce Market Committee elections.
NMC Heatstroke Plan : उष्माघाताच्या धास्तीने महापालिका ॲक्शन मोडवर! सरकारी रुग्णालयात 20 खाटा आरक्षित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.