Dondaicha Railway Bridge News : दिवाळीपर्यंत उड्डाणपुल पूर्ण करावा; आमदार जयकुमार रावल यांची यंत्रणेला सूचना

Dondai: Jayakumar Rawal laying the foundation for flyover slab work. Neighbors are dignitaries and officers of BJP.
Dondai: Jayakumar Rawal laying the foundation for flyover slab work. Neighbors are dignitaries and officers of BJP.esakal
Updated on

Dhule News : दोंडाईचा-शिंदखेडा मार्गावरील पुलाचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करावे, अशी सूचना माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी यंत्रणेला दिली. आमदार रावल यांच्या हस्ते उड्डाणपुलाच्या स्लॅबच्या कामासंदर्भात पायाभरणीचा कार्यक्रम झाला.

रेल्वेचे अभियंता बागूल, रवी उपाध्ये, निखिल जाधव, नबू पिंजारी, प्रवीण महाजन, किशन दोधेजा, जितू गिरासे, कृष्णा नगराळे, चिरंजीवी चौधरी, नरेंद्र कोळी, राजू धनगर, विजय मराठे, चंद्रकला सिसोदिया, इशरत बानो शेख, अनिल सिसोदिया, भिकन बागवान, ईश्वर धनगर, खलील बागवान, प्रमोद चौधरी, कैलास दीक्षित, वीरेंद्र गिरासे, पंकज चौधरी, राकेश अग्रवाल, चंद्रसिंग राजपूत, महेंद्र गिरासे आदी उपस्थित होते. (Flyover to be completed by Diwali MLA Jaykumar Rawal instruction to system Dhule News)

रावल यांची सूचना

आमदार रावल म्हणाले, की दोंडाईचा ते शिंदखेडा, शिंदखेडा ते चिमठाणे आणि दोंडाईचा शहरातून जाणाऱ्या जुन्या शहादा रस्त्यावर रेल्वेचे गेट वारवार बंद होत असल्याने गैरसोय होते. त्यामुळे या तीन ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल मंजूर करून आणला. पैकी शिंदखेडा रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले.

दोंडाईचा शहरात अवजड वाहने येऊ नयेत म्हणून रहदारी दुसऱ्या मार्गाने वळविण्यासाठी उड्डाणपुलाच्या डिझाइनमध्ये बदल केले. जुन्या शहादा रोडवरील उड्डाणपुलामुळे दोंडाईचा शहराचे सौंदर्य नाहीसे होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढावा लागू शकतो.

त्यामुळे हे काम रद्द करण्याची जनतेची मागणी होती. त्यामुळे ते काम बंद करण्यात आले. दोंडाईचा शिंदखेडा मार्गावरील पुलाचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करावे, अशी सूचना यंत्रणेला दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dondai: Jayakumar Rawal laying the foundation for flyover slab work. Neighbors are dignitaries and officers of BJP.
Nashik News : किरकोळ कारणावरून चालकाला मारहाण; इंधन वाहतूकदारांचे वाहतूक बंद आंदोलन

दोंडाईचाचा विकास

दोंडाईचाच्या विकासाबाबत आमदार रावल म्हणाले, की या शहराचा चहूबाजूंनी विकास होत आहे. रेल्वे गेटवर उड्डाणपुलाचे काम सुरू असताना दुसरीकडे मुंबईला जाण्यासाठी रोज प्रवासी गाडी सुरू केल्याने मोठी सोय झाली आहे.

पुढील काळात पश्चिम खानदेशातील जनतेला पुण्याला जाण्यासाठी नवीन गाडी सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. दोंडाईचासह शिंदखेडा, नरडाणा आणि बेटावद स्थानकाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे.

दोंडाईचा-शिंदखेडा- अमळनेर रस्ता ज्या धर्तीवर झाला, त्या धर्तीवर तालुक्यातील इतर मुख्य रस्ते करण्यास मंजुरी मिळाली आहे. औद्योगिक विकासासाठी तालुक्यात पोषक स्थिती होत आहे.

Dondai: Jayakumar Rawal laying the foundation for flyover slab work. Neighbors are dignitaries and officers of BJP.
Nashik News : जिल्ह्यात 250 शिक्षकांचे निवृत्तिवेतन थकले; पालकमंत्र्यांसमोर केंद्रप्रमुख संघाची कैफियत

उड्डाणपुलाचा लाभ

दोंडाईचा-शिंदखेडा रस्त्यावर रेल्वे गेट क्रमांक १०५ वर नव्याने तयार होत असलेल्या दुपदरी उड्डाणपुलाच्या कामाला तीन ठिकाणी अॅप्रोच असून, शिंदखेड्याकडून येणाऱ्या रस्त्यावर ९.५ मीटर, दोंडाईचा शहराकडील रस्त्यावर ७.५ मीटर असून, या ठिकाणी फक्त कार आणि मोटारसायकल जाऊ शकेल.

धुळे बायपासकडे जाणाऱ्या ॲप्रोच रोडला १२ मीटरची रंदी असणार आहे. या पुलाच्या कामाचा प्रारंभ २०१९ मध्ये तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री तखा खासदार डॉ. सुभाष भामरे व तत्कालीन पर्यटनमंत्री आमदार रावल यांच्या हस्ते पार पडला होता.

Dondai: Jayakumar Rawal laying the foundation for flyover slab work. Neighbors are dignitaries and officers of BJP.
Dhule News : तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.