Nandurbar News: आदिवासी क्षेत्रातील शाळा डिजिटल करणार : डॉ. विजयकुमार गावित

दुर्गम भागातील शिक्षकांमध्ये प्रचंड क्षमता
District Student Adarsh ​​Teacher Award distribution along with the awardee teacher, Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit Neighboring District President Dr. Supriya Gavit, Dr. Hina Gavit, Suhas Samana, Ganesh Paradke, Sangeeta Gavit, Shankar Padavi etc.
District Student Adarsh ​​Teacher Award distribution along with the awardee teacher, Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit Neighboring District President Dr. Supriya Gavit, Dr. Hina Gavit, Suhas Samana, Ganesh Paradke, Sangeeta Gavit, Shankar Padavi etc.esakal
Updated on

Nandurbar News : पुढील दोन वर्षात राज्यात आदिवासी भागातील सर्व शाळांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असून अभावाने ग्रासलेल्या दुर्गम भागात शिक्षणाचा प्रभाव निर्माण करून या भागातील माणूस उभा करण्याची क्षमता फक्त शिक्षकात आहे.

असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. (Dr Vijayakumar Gavit statement Digitalization of schools in tribal areas Nandurbar News)

शुक्रवारी (ता.२९) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित २०२२-२३ च्या जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, शिक्षण सभापती गणेश पराडके, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित,

समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, रूपसिंग तडवी, सुरेश नाईक, शिक्षणाधिकारी सतीश चौधरी (प्राथमिक), प्रवीण अहिरे (माध्यमिक), ‘डायट’ चे प्राचार्य डॉ. जयराम भटकर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना वळवी, डॉ. युनुस पठाण (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी (योजना) भावेश सोनवणे उपस्थित होते.

डॉ. गावित म्हणाले, ग्रामीण, आदिवासी भागातील शिक्षकांनी काळानुसार अपडेट राहणे गरजेचे आहे. शिक्षकांनी सध्याच्या शिक्षण प्रवाहातील नवतंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करायला हवे. यासह शाळांना लागणाऱ्या इंटरनेट, ब्रॉडबॅण्ड, संगणक, दूरचित्रवाणी संच यासारख्या सर्व माहिती- तंत्रज्ञान सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती असते, कैक किलोमीटर अंतरावर शाळा असते. रस्ते खडतर असतात, काही शाळा एक शिक्षकी असतात, अशा परिस्थितीतही गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे आवर्जून कौतुक होते. या कौतुकाचे खरे श्रेय आदिवासी भागातील खडतर परिश्रम करणाऱ्या शिक्षकांचे असते.

डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या की, जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत, अथवा जुन्या अथवा ज्यांना स्वमालकीच्या इमारती नाहीत अशा शाळांच्या इमारतींच्या निर्माणाची प्रक्रिया आदिवासी विकास विभागाच्या माध्यामातून सुरू करण्यात आली आहे.

District Student Adarsh ​​Teacher Award distribution along with the awardee teacher, Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit Neighboring District President Dr. Supriya Gavit, Dr. Hina Gavit, Suhas Samana, Ganesh Paradke, Sangeeta Gavit, Shankar Padavi etc.
Swachh Bharat Abhiyan: जिल्हाभरात सोमवारी एक तास श्रमदानाचा उपक्रम : ZP CEO मित्तल

यासाठी १९ शाळांच्या इमारती उभारण्यासाठी सुमारे ८ कोटी ५० लाखांचा निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

डॉ. हिना गावित यांनी देखील यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले, की अन्य कुठल्याही भागात काम करण्यापेक्षा आदिवासी दुर्गम भागात काम करणे शिक्षकांसाठी आव्हानात्मक असते. या भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संवादाची पहिली भाषा ही बोली भाषा असते.

अशा बोली भाषेतून बाल्यावस्थेतील मुले जेव्हा शिक्षण घेण्यासाठी शाळेत येतात तेव्हा अशा मुलांना शिकविण्यासाठी शिक्षकांना सर्वप्रथम या भागातील बोली भाषा शिकावी लागते.

त्यांनतर बोली भाषा आणि मातृभाषा या दोन्ही भाषांमधून विद्यार्थ्यांची आकलनक्षमता वाढवण्याचे आव्हानात्मक आणि अत्यंत चिकाटीने आदिवासी दुर्गम भागातील शिक्षक करत असतात.

आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी शिक्षक

रोहिणी पाटील (लोय), बालकिसन ठोंबरे (आमलाण), डॉ. जितेंद्रगीर गोसावी (टवळाई), समाधान घाडगे (अमोनी),प्रवीणकुमार देवरे(राजमोही), विजयसिंग पराडके (गौऱ्या), विशेष उत्तेजनार्थ : ओमशेखर काळा (पाचोराबारी), नारायण नांद्रे (शनिमांडळ, मुली), विभावरी पाटील (धडगाव), राज्य शिक्षक : पंकज भदाणे (बोरीपाडा), अनिल माळी (वरुळ), रवींद्र गुरव (तळोदा).

District Student Adarsh ​​Teacher Award distribution along with the awardee teacher, Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit Neighboring District President Dr. Supriya Gavit, Dr. Hina Gavit, Suhas Samana, Ganesh Paradke, Sangeeta Gavit, Shankar Padavi etc.
Nashik News: अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षक आक्रमक! राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे सोमवारी महाआक्रोश मोर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.