Nandurbar News : आदिवासी दिव्यांगांचा वैद्यकीय खर्च शासन करणार : डॉ. विजयकुमार गावित

Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit, Chairman of Divyang Welfare Department Omprakash alias Bachchu Kadu etc.
Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit, Chairman of Divyang Welfare Department Omprakash alias Bachchu Kadu etc.esakal
Updated on

Nandurbar News : दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी शासन संवेदनशील असून, राज्यातील १७ आदिवासीबहुल जिल्ह्यांतील आदिवासी दिव्यांग बांधवांच्या वैद्यकीय उपचार, विविध शस्त्रक्रियांचा खर्च आदिवासी विकास विभागामार्फत केला जाईल, अशी घोषणा गुरुवारी (ता. ७) राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केली.

येथील श्री छत्रपती शिवाजी नाट्यमंदिरात ‘दिव्यांगांच्या दारी’ कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. (Dr Vijayakumar Gavit statement Medical expenses of tribal disabled will be governed nandurbar news)

दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, समाजकल्याण उपायुक्त सुंदरसिंग वसावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, तहसीलदार नितीन गर्जे, विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी खत्री यांनी जिल्ह्यातील दिव्यांग कल्याणासाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमांची व नियोजनाची माहिती सांगून दिव्यांगांच्या दारी कार्यक्रमाची संकल्पना विशद केली.

डॉ. गावित म्हणाले, की आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी पाच टक्के निधीच्या तरतुदीसह जिल्हा नियोजन समिती व जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या राखीव निधीचा त्यांना लाभ दिला जात आहे. आदिवासी विकास विभागाच्या जास्तीत जास्त योजनांमध्ये त्यांचा समावेश केला जाईल.

दिव्यांगांच्या सन्मानासाठी...

जिल्ह्यातील सुमारे एक हजार ३०० दिव्यांग बांधवांना विविध यंत्र व साहित्याचे वितरण करण्यात आले. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील दिव्यांग बचत गटांना उभारी देण्याबरोबरच त्यांना समाजात स्वाभिमानाने व सन्मानाने जगण्यासाठी उभारी देण्याचे काम शासन, प्रशासनामार्फत करण्यात येईल, असेही डॉ. गावित म्हणाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit, Chairman of Divyang Welfare Department Omprakash alias Bachchu Kadu etc.
Nandurbar News : बारमाही रस्त्यांसाठी 1 हजार कोटींची तरतूद : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

यांना दिला विविध योजनांचा लाभ

- दिव्यांग जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान ः विलास वसावे, रविताबेन वसावे

- श्रवणयंत्र : गणेश वळवी, पीयूष गावित, नैतिक वसावे, केतेश्वर गावित, तन्मय वळवी, अश्विन वळवी, विकास वसावे

- व्हीलचेअर ः वेदांत चौधरी

- हॅंडिकॅप स्टिक ः श्रावण चव्हाण, भाऊसाहेब बच्छाव

- व्यवसाय कर्ज वितरण ः अरुणा पाटील, आशाबाई भिल, कुसुमबाई पाटील

- संजय गांधी निराधार योजना ः मुद्दस्सर खान वाहिद खान, गिरीश वसावे, मृणाली बोरसे, संजय पावरा

- आनंदाचा शिधा व इ-रेशनकार्ड प्रमाणपत्र ः मोहम्मद खलील इस्माईल मोमीन, विजय ठाकरे

- शबरी आवास योजना ः गजमल वळवी, ताराबाई गावित, मुकेश पवार, निर्मला ठाकरे

- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत नवीन विहिरींसाठी अनुदान ः भावजी पाडवी

- ठिबक संच : मदन बेलदार

- ट्रॅक्टर : गणेश बावा

Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit, Chairman of Divyang Welfare Department Omprakash alias Bachchu Kadu etc.
Nandurbar News : जिल्ह्यात बिरसा मुंडा जोडरस्ते योजना राबविणार; डॉ. विजयकुमार गावित यांची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.