Nandurbar News : गावातच मिळणार हक्काचा रोजगार : डॉ. विजयकुमार गावित

cow
cowesakal
Updated on

Nandurbar News : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या संयुक्त दायित्व गटांच्या पथदर्शी दुग्धविकास प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना आत्मनिर्भर करण्यासाठी संयुक्त गटांना दुधाळ गायींचे वितरण करण्यात येत असून, त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना आपल्याच गावात आपल्या हक्काचा रोजगार मिळणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.(Dr Vijaykumar gavit statement of employment will be available in village itself nandurbar news)

ते नंदुरबार तालुक्यातील लक्ष्मीखेडा येथे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या संयुक्त दायित्व गटांच्या पथदर्शी दुग्धविकास प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना दुधाळ गायींच्या वितरण समारंभात बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. कुमुदिनी गावित, माजी आमदार शरद गावित, जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, अर्चना गावित, राजेश्री गावित, शबरी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, नंदुरबार एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार व विविध यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, शबरी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांचीही भाषणे झाली. तसेच ९७ गटांना दुधाळ गायींचे वितरणपत्र वितरित करण्यात आले.

cow
Nandurbar News : आदिवासी संस्कृती टिकवायची असेल तर बोली भाषेची समृद्धी जोपासावी लागेल : राज्यपाल रमेश बैस

साडेबारा हजार कुटुंबांचे उद्दिष्ट

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत संयुक्त दायित्व गटांच्या माध्यमातून पथदर्शी दुग्धविकास प्रकल्पातून या योजनेची अंमलबजावाणी सुरू असून, महाराष्ट्र, गुजरातच्या सीमावर्ती क्षेत्रातील नाशिक, पालघर, नंदुरबार जिल्ह्यात गुजरातमधील सुमुल सहकारी दुग्धविकास प्रकल्पाच्या माध्यमातून ही योजना पाच वर्षांत यशस्वी करून आदिवासी कुटुंबांच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे.

सुमारे दोन हजार ५०० संयुक्त दायित्व गटांच्या माध्यमातून १२ हजार ५०० लाभार्थ्यांना कुटुंबांना ही योजना देण्याचे उद्दिष्ट आहे, डॉ. गावित यांनी सांगितले.

cow
Nandurbar News : महावीर स्वामी निर्वाण महोत्सवानिमित्त 75 किलोचा लाडू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.