Dhule Municipality News : प्रशासकांकडून चांगल्या मनपा शाळांचे स्वप्न! महिला, दिव्यांग कल्याणावरही भर

महापालिकेतील आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी महापालिकेच्या बजेटमधून अनेक स्वप्ने दाखविली.
Dhule Municipal corporation
Dhule Municipal corporationesakal
Updated on

Dhule Municipality News : महापालिकेतील आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी महापालिकेच्या बजेटमधून अनेक स्वप्ने दाखविली. गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी भाजपनेही या स्वप्नांमध्ये भरच पाडली.

प्रत्यक्षात बजेटमध्ये दाखविलेली स्वप्ने प्रत्यक्षात उतरलेली पाहायला मिळाली नाहीत. ()

महापालिकेत १ जानेवारीपासून प्रशासकराज सुरू झाले आहे. महापालिकेच्या निवडणुका कधी होतील माहीत नाही. त्यामुळे प्रशासकांच्या माध्यमातूनच शहरवासीयांच्या मूलभूत गरजा व इतर विकासकामे पूर्ण होणार आहेत. दर वर्षी महापालिकेच्या बजेटमधून धुळेकरांना काय मिळणार याची उत्सुकता असते.

प्रशासनाकडून प्रशासकीय धाटणीतला बजेट सादर होतो. त्यात स्थायी समिती व नंतर महासभेत विशेषतः पदाधिकारी काही स्वप्ने दाखवितात. गेल्या पाच वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात व त्यापूर्वीदेखील पदाधिकाऱ्यांनी बजेट मांडताना विविध स्वप्ने दाखविली. प्रत्यक्षात कचरा, रस्ते, गटारांच्या पलीकडे मजल गेली नाही.

केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांचा गाजावाजा करण्यातच धन्यता मानली गेली. मात्र, महापालिकेच्या बजेटमध्ये दाखविलेले एकही स्वप्न पूर्ण झाल्याचे दिसत नाही. आता प्रशासकराज असल्याने महापालिकेचा बजेटही प्रशासकांच्या अखत्यारीतच स्थायी समिती, महासभेत सादर होऊन तो मंजूर करण्यात येणार आहे.

त्यातही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी स्थायीसह महासभेत यंदाचा बजेट मंजूर व्हावा, असा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने त्यांनी अधिकाऱ्यांना बजेट तयार करण्याच्या सूचनाही दिल्या. त्यामुळे बहुतेक चालू आठवड्यात बजेट सादर होऊन अर्थातच त्याला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Dhule Municipal corporation
Dhule Municipality News : 11 कोटींवर खर्चाच्या कामांना मंजुरी; मनपा शाळा-20 साठी नवी इमारत,

चांगल्या शाळांचे स्वप्न

शहरात महापालिकेच्या शाळांची काय अवस्था आहे हे वेगळे सांगायला नको. त्यातही मराठी माध्यमाच्या शाळा ऊर्दू माध्यमाच्या शाळांपेक्षा वाईट स्थितीत आहेत. अर्थात ऊर्दू शाळांची स्थितीदेखील चांगली म्हणता येईल अशी नाही. पण मराठीपेक्षा ऊर्दू शाळा बऱ्या असे म्हणावे लागले एवढाच काय तो फरक आहे.

कोट्यवधी रुपये किमतीच्या जागांवर असलेल्या मनपा शाळांची दयनीय अवस्था धुळेकरांसाठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. दरम्यान, आता मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांनी यंदाच्या बजेटमध्ये मनपा शाळांवर फोकस करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अर्थात आपल्या पाल्यांना मनपा शाळांत पाठवावेसे पालकांना वाटले पाहिजे अशा शाळा उभ्या राहाव्यात, अशी अपेक्षा श्रीमती दगडे-पाटील यांनी व्यक्त केली.

त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करणे, बजेटमध्ये त्यासाठी तरतूद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात किमान चार-पाच मनपा शाळांची स्थिती चांगली पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा बदल झाला तर इतर अधिकाऱ्यांसह निवडणुकीनंतर येणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठीही तो आदर्श ठरेल यात शंका नाही.

आउटपुट देणारे बजेट हवे

महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये महिला बालकल्यण, दिव्यांग कल्याण यांच्यावरही फोकस करण्याच्या सूचना प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांनी दिल्या आहेत. परफॉर्मन्स दाखविणारा, आउटपूट देणारा बजेट तयार करण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

Dhule Municipal corporation
Dhule Municipality News : स्मारके, धार्मिक स्थळांजवळ आता ‘नो चमकोगिरी’; महापालिका महासभेत निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()