Nandurbar News : जिल्ह्यातील 14 महसुली मंडळांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर

drought
droughtesakal
Updated on

Nandurbar News : राज्यातील एक हजार २१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती शासनाने घोषित केली आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील १४ महसुली मंडळांचा समावेश आहे. चाळीस तालुक्यांत दुष्काळ घोषित केल्यानंतर दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या महसुली मंडळांचीदेखील शासनाने घोषणा केली आहे.

त्यामुळे या महसूल मंडळांमध्ये दुष्काळाच्या सवलती लागू होणार आहेत.(Drought situation declared in 14 revenue board of district nandurbar news )

नंदुरबार जिल्ह्यात यापूर्वी संपूर्ण नंदुरबार तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यात आता तळोदा, नवापूर व शहादा तालुक्यातील १४ महसुली मंडळांची भर पडली आहे.

राज्यातील ४० तालुक्यांत कमी पर्जन्यमानामुळे ३१ ऑक्टोबर २०२३ ला शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. त्यामुळे ४० तालुक्यांत विविध सवलतींची घोषणा करण्यात आली होती. मात्र इतर तालुक्यांतील एक हजार २१ महसुली मंडळांमध्ये कमी पर्जन्यमान आढळून आले होते. त्यामुळे त्या महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.

यात नंदुरबार जिल्ह्यातील १४ महसुली मंडळांचा समावेश आहे. शहादा तालुक्यातील सारंगखेडा, वडाळी, मंदाणे, असलोद, शहादा, मोहिदे, कलसाडी, प्रकाशा, ब्राह्मणपुरी, म्हसावद तसेच तळोदा तालुक्यातील बोरद व सोमावल, नवापूर तालुक्यातील खांडबारा व विसरवाडी मंडळांचा समावेश आहे. त्यामुळे या मंडळांमधील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीच्या सवलती लागू होणार आहेत.

drought
Nandurbar News : दिवाळी फराळवाटप; सामाजिक भानामुळे गोरगरिबांची दिवाळी गोड

दुसरीकडे यंदाच्या पावसाळ्यात तळोदा तालुक्यात पावसाने जेमतेम हजेरी लावली होती. त्यात पावसाची आकडेवारी मंडळनिहाय कमी-जास्त होती. त्यात तळोदा मंडळात ७९१ मिलिमीटर, बोरद मंडळात ५२१ मिलिमीटर, प्रतापपूर मंडळात ७२३ मिलिमीटर व सोमावल मंडळात ८४४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती.

त्यात भूगर्भातील पाण्याची पातळी आताच खोल जाऊ लागली आहे. मात्र तळोदा तालुक्यातील केवळ दोनच मंडळांत दुष्काळसदृश स्थिती घोषित करण्यात आल्याने संपूर्ण तळोदा तालुका व नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती घोषित करावी व सवलती लागू कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे.

drought
Nandurbar News : अश्वत्थामा यात्रेस प्रारंभ; भाविकांच्या संख्येत वाढ

अशा असतील सवलती

-जमीन महसुलात सूट

-सहकारी कर्जाचे पुनर्गठन

-शेतीशी निगडित कर्जाची वसुली स्थगिती

-कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट

-शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी

-रोहयोंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता

-आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर

-टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे या सवलती लागू होणार आहेत.

drought
Nandurbar News :सार्वजनिक जागेवर फटाके विक्री; गुन्हा दाखल झाल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.