Nandurbar News : अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यांसह होणारा पाऊस तसेच, गारपीट आदी कारणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
मात्र गेल्या चार वर्षांपासून कोळदा (ता. नंदुरबार) येथे डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्रात जिल्हा कृषी हवामान केंद्र मागील चार वर्षापासून कार्यरत आहे. (due Agricultural Meteorological Center farmers are getting timely weather forecast and they becoming alert nandurbar news)
या केंद्रातून शेतकऱ्यांना हवामान बदलाचे सल्ले देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळीच हवामानाचा अंदाज प्राप्त होत असून शेतकरी सावध होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होण्यास मदत झाली आहे.
हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी होण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज व कृषी सल्ला पोचविण्याच्या दृष्टीने भारतीय हवामान विभाग आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी हवामान केंद्र मागील जवळपास ४ वर्षापासून कार्यरत आहे.
जिल्हा कृषी हवामान केंद्रातर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आणि त्यावर आधारित कृषी सल्ला पत्रिका दर मंगळवारी आणि शुक्रवारी व्हाट्सॲपवर संदेश तसेच, इतर माध्यमातून देण्यात येतो. जिल्ह्यातील जवळपास १८ हजार शेतकऱ्यांपर्यंत व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हवामानाची माहिती देण्यात येते. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना पिकाचे नियोजन करण्यात आणि हवामानामुळे होणारे पिकांचे नुकसान कमी करण्यास मदत होत आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
अंदाजानंतर उपाय, शेतकऱ्यांना फायदा
नंदुरबार जिल्ह्यात मागील महिन्यात १३ ते १७ मार्च दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच, गारपीट होण्याचा अंदाज होता. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पक्वता अवस्थेत असलेल्या मका, हरभरा, ज्वारी, गहु, भाजीपाला आदी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे. शेतात काढून ठेवलेल्या धान्यांना ताडपत्रीने झाकून ठेवावे.
काढणीस आलेली पपई, केळीची फळे तोडून ठेवावीत. वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडू नये म्हणून भाजीपाला तसेच फळपिकांना आधार देण्याची व्यवस्था करा असा सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्राकडून ५ ते ६ दिवस पूर्वीच देण्यात आला. ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पिकाची काढणी करून घेतली, ज्यामुळे त्यांचे नुकसान झाले नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदाच झाला.
"पावसाचा, वादळी वाऱ्याचा अंदाज मिळाल्यानंतर मी माझ्या शेतात असलेल्या केळी आणि पपईची पक्व झालेल्या फळांची काढणी करून घेत विक्री देखील केली. केळीचे झाड वादळी वाऱ्यामुळे पडू नये यासाठी आधार दिला, ज्यामुळे माझ्या बागेचे नुकसान झाले नाही. अंदाज मिळाल्याने योग्यवेळी काढणी केल्याने फळांचे नुकसान झाले नाही." - सुरेश पाटील विद्याविहार, (ता. शहादा).
"हरभरा पिकाची दीड एकर क्षेत्रावर लागवड केली होती. मार्च महिन्यात दुसऱ्या आठवड्यात शेतातील हरभरा पीक काढणीस तयार झालेले होते. त्यातच मला अवकाळी पाऊस, गारपीट होण्याचा हवामानाचा अंदाज कृषी हवामान केंद्राकडून मिळाला. त्यामुळे लागलीच हरभरा पिकाची काढणी करून घेतली, ज्यामुळे माझे हरभरा पिकाचे नुकसान होण्यापासून वाचले." - रमेश पावरा हरणखुरी, (ता. अक्राणी).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.