Dhule News : शेतकरी, सामान्यांची दिवाळी आनंदात; राज्य शासनाकडून मदतीबद्दल समाधान

Gajendra Ampalkar
Gajendra Ampalkaresakal
Updated on

Dhule News : राज्य सरकारने जून-जुलै महिन्यातील पूर व अतिवृष्टीमुळे पिके व शेतजमिनींचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तत्काळ एक हजार ७१ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

आनंदाचा शिधावाटपात पोहे व मैद्याचाही समावेश झाल्याने सामान्य कुटुंबांची दिवाळी अधिक आनंदात होणार आहेत, अशी भावना भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी व्यक्त केली.(due to help of state government common people and farmers happy dhule news)

यंदाच्या दिवाळीनिमित्त वितरित होणाऱ्या आनंदाचा शिधा किटमध्ये रवा, हरभराडाळ, साखर व खाद्यतेलासोबत मैदा, पोहे यांचाही समावेश करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, हरभराडाळ, मैदा व पोहे असा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान वितरित करण्यात येणार आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्यांचे सणासुदीचे दिवस गोड होणार आहेत.

Gajendra Ampalkar
Dhule Agriculture Scam : जिल्हा कृषी यंत्रणेत ‘कुंपणच शेत खाते तेव्हा... नातेवाइकांआडून थाटला व्यवसाय!

तसेच आपत्तीग्रस्त बळीराजालाही दिलासा मिळणार आहे. जून-जुलै २०२३ या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके व शेतजमिनीच्या नुकसानीबद्दल राज्य सरकारने एक हजार ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, याद्वारे राज्यातील १४ लाख नऊ हजार ३१८ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम थेट जमा होणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांना या मदतीसाठी सरकारदरबारी खेटे घालावे लागणार नाहीत, असेही श्री. अंपळकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. जनहिताच्या प्रश्नावर संवेदनशीलता व शासकीय व्यवहारांत पारदर्शकता यामुळे राज्यातील महायुती सरकार आदर्श सरकार ठरले असून, त्याचा भाजपला अभिमान असल्याचेही श्री. अंपळकर यांनी नमूद केले.

Gajendra Ampalkar
Dhule Agriculture News : क्रांतिकारकांच्या गावाचा मुळा खातोय भाव; सुरत, शहादा बाजारात लिलावास प्रथम प्राधान्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()